ETV Bharat / state

नागपूर हिट अँड रन हत्या प्रकरण : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल फोन जप्त, धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता - Nagpur Hit And Run Murder Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 10:47 AM IST

Nagpur Hit And Run Murder Case : संपत्तीसाठी सासऱ्याचा काटा काढणाऱ्या उच्चपदस्थ सुनेला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अर्चना पुट्टेवार असं त्या सुनेचं नाव असून तिचा मोबाईल फोन जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं. त्यामुळे या प्रकरणात आता मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur Hit And Run Murder Case
संपादित छायाचित्र (Reporter)

नागपूर Nagpur Hit And Run Murder Case : पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हिट अँड रन सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा तपास वेगानं पुढं जात आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे देखील होतं आहेत. नागपूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवारसह तिचा भाऊ प्रशांत आणि इतर आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं. पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात अर्चना पुट्टेवारचा मोबाईल महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हा फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. मोबाईल फोनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता निर्माण झाली.

Nagpur Hit And Run Murder Case
अर्चना पुट्टेवार (Reporter)

अर्चना पुट्टेवारनं लपवलेला फोन हस्तगत : अर्चना पुट्टेवारची पर्सनल सेक्रेटरी आणि या हत्या प्रकरणात आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीनंतर पोलिसांनी मोबाईल फोन हस्तगत केला आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून अर्चना पुट्टेवारला अटक केली. तेव्हापासूनच अर्चना पुट्टेवारनं आपला मोबाईल फोन गायब केला. अनेक प्रयत्न करुनही पोलिसांना अर्चना पुट्टेवाराचा मोबाईल फोन मिळून आला नाही. मात्र, अर्चना पुट्टेवारचा मोबाईल फोन पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात फोनमधील रेकॉर्डच्या आधारे अत्यंत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur Hit And Run Murder Case
पुरुषोत्तम पुट्टेवार (Reporter)

काय आहे प्रकरण : पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात तब्बल कोट्यवदी रुपयांची संपत्ती आहे. ही सगळी संपत्ती संपत्ती केवळ आपल्यालाच मिळावी, या हेतूनं आर्चना पुट्टेवार हिनं सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केली. रस्ते अपघातात बनाव झाल्याचं दाखवल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचं तपासात उघड झालं. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खुनातील मास्टरमाइंड ही अर्चना मंगेश पुट्टेवार आहे. अर्चना पुट्टेवार ही गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहे. अर्चनानं तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीनं सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारनं चिरुडन हत्या केली.

हत्या करताना अपघाताचा रचला बनाव : पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा बालाजी नगर परिसरात अपघाती मृत्यू झाल्याची घटना 22 मे रोजी घडली होती. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात अनेक कोटीची संपत्ती आहे. पुरुषोत्तम आणि त्यांच्या मुलात संपत्तीचा वाद न्यायालयात सुरू होता. पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपली संपूर्ण संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील, या भीतीनं सून अर्चना पुट्टेवारनं तिचा भाऊ प्रशांत पार्लेकर याच्या मदतीनं सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

यापूर्वी दोन वेळा फसला प्रयत्न : मुख्य आरोपी अर्चनाच्या निर्देशावरुन सार्थकनं दोनदा पुरुषोत्तम पुट्टेवार यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ते थोडक्यात वाचले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानं एक कार विकत घेतली. 22 मे रोजी ती कार पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अंगावर घालून त्यांची हत्या केली. पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणाची मास्टरमाइंड ही त्यांची सून अर्चना असून कामात अर्चनाचा भाऊ प्रशांत हा सहभागी आहे, असा आरोप पोलिसांनी केला. प्रशांतनं सार्थक आणि अन्य आरोपींची मदत घेतली.

सुपारी किलरला लाखोंचे आमिष : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांनी अगदी नियोजित पद्धतिनं हत्येचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या घरातील चालक सार्थक बागडे, नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना लाखो रुपायांचं आमिष दाखवून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारनं चिरडून हत्या केली. आरोपींनी या कामात दोन कार आणि पाळत ठेवण्यासाठी दुचाकीचा वापर केला. गुन्ह्यात वापरलेली सर्व वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत.

हेही वाचा :

  1. दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case
  2. पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरण : 'एमएसएमई'चे संचालक प्रशांत पार्लेवार यांना अटक - Nagpur Hit And Run Murder Case
  3. महिला अधिकाऱ्यानं संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा, सहा जणांना अटक - Nagpur Hit And Run

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.