मुंबई Police Recruitment Process : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध १७ हजार पदे रिक्त होती. यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेले आहेत. याविषयी पोलीस अधिकारी राजकुमार व्हटकर म्हणाले की, कारागृह भरतीही आम्ही करत असतो. १ हजार ८०० पदासाठी ३ लाख ७२ हजारहून अधिक अर्ज आलेले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती करणं शक्य नव्हतं. मात्र, १९ जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे.
दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची मुभा : १९ जून पासून भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती. दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही. त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक : भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतं आहेत. ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल. ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि मेरिट बेसेड होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फ्रॉड असं केलं जात नाहीत. असं आतापर्यंत झालेलं नाही आणि महाराष्ट्र पोलीस दलाची ही उज्वल परंपरा ठेवणार आहोत, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गोपनीय यंत्रणा तैनात : राजकुमार व्हटकर यांनी पुढे सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही आमची गोपनीय यंत्रणाही मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा त्या ठिकाणी तैनात करू. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी कुठलाही एजंट मला जर कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही जे स्थानिक घटक प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमचे अँटी करप्शन ब्युरोचे जे लोक आहेत त्यांचे नाव नंबर्स त्या ठिकाणी ठेवलेले असतात. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व उमेदवारांना हे व्हटकर यांच्याकडून सांगण्यात आले की, कोणत्याही अमिषाला आपण बळी पडू नका. पोलीस भरती ही पूर्णपणे नि:पक्षपाती आणि पारदर्शी पद्धतीनं होणार आहे. मेरिट बेसेड होणार आहे.
आश्वासनांना बळी पडू नका : पोलीस अधिकारी व्हटकर पुढे म्हणाले की, आपल्याला जर कुठला एजंट, काही क्लासचालक किंवा कुठला संस्था चालक आश्वासनं देत असेल किंवा पैसे मागत असेल तर कोणीही देऊ नये. तसं निदर्शनास आलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता आणि आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. मागच्या वर्षी काही ठिकाणी गैरप्रकार केल्याचं जे निदर्शनास आलं होतं त्या सर्वांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले. मागच्या वर्षी मुंबईतून 57 असे प्रकार उघडकीस आले असल्याची माहिती व्हटकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- "रवींद्र वायकरांच्या निकालात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोठा हात''; संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Mumbai North West election
- "नवनीत राणा निवडून आल्या असत्या तर..."; आमदार रवी राणांनी बच्चू कडूंना सुनावलं - Ravi Rana On Navneet Rana
- ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल - EVM Hacking Case