ठाणे Barbala Obscene Dance : भिवंडी तालुक्यातील दापोडा रोडवरील वळपाडा येथील न्यू अप्सरा बारवर ऑर्केस्टा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत नृत्य करीत असतानाच नारपोली पोलिसांनी छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. या छापेमारीत बार मॅनेजर, २ पुरुष वेटरसह ५ महिला वेटर (बारबाला) आणि ६ ग्राहकांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या कारवाईने बार मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहाटेच्या सुमारास बारवर छापा : नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील दापोडा रोडवरील वळपाडा येथील न्यू अप्सरा बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत नाचत असल्याची माहिती मिळाली. सदर बार हा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी २० जूनला पहाटेच्या सुमारास न्यू अप्सरा बारवर छापा टाकला. त्यावेळी बारबाला मंद प्रकाशात अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करीत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात पोशि जनार्दन शिवाजी बंडगर यांच्या फिर्यादीवरून सर्वांवर भादंविच्या कलम २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना जाधव करीत आहेत.
भिवंडीत २३च्या जवळपास ऑर्केस्टा बार : भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई–नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे २३ च्या जवळपास बार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा-डान्सबारचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यापूर्वी भिवंडीतील एका डान्सबारमधील बारबालावर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरू राहत असल्याचं नारपोली पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आलं आहे.
हेही वाचा:
- १४ कोटी रुपयांचं गव्हर्मेंट शेअर्स फसवणूक प्रकरण; आरोपीच्या कोलकात्यातून आवळल्या मुसक्या - Government Shares Case
- मुंबईत लवकरच मोफत वायफाय सुविधा सुरू होणार; कोणाला मिळणार लाभ? - Free Wi Fi In Mumbai
- कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming