ETV Bharat / state

अपघाताच्या रात्री मिहीर शाहनं बारमध्ये ढोसले मोठे पेग; रस्त्यात चार बिअरचे कॅन केले खाली - Mumbai BMW Hit And Run - MUMBAI BMW HIT AND RUN

Mumbai BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शाह यानं एका महिलेला चिरडलं. या अपघाताच्या वेळी आरोपी मिहीर शाह यानं दारू ढोसली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

Mumbai BMW Hit And Run
आरोपीला नेताना पोलीस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 7:19 AM IST

मुंबई Mumbai BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह हा अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. शनिवारच्या रात्री हॉटेल वाईस ग्लोबल बारमध्ये मिहीरनं चार मोठे पॅक ढोसले, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढं आली. त्यानंतर रस्त्यात त्यानं बिअरचे चार कॅन खाली केले, असंही तपासात उघड झालं. बुधवारी रात्री वरळी पोलिसांचं पथक मुख्य आरोपी मिहीर शाह याला घेऊन अपघाताच्या रात्री ते फिरले त्या त्या ठिकाणी गेलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मिहीर नशेत असल्याचं झालं उघड : सुरुवातीला मिहीरनं पोलिसांसमोर दावा केला की, अपघाताच्या वेळी तो कार चालवत होता, तेव्हा त्याने मद्यपान केलं नव्हतं. मात्र, मुंबई पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात तो दारूच्या नशेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय त्यानं दोन वेगवेगळ्या ठिकाणी मद्यपान केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांना दिलेल्या जबाबात मिहीरनं "आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केल्याचं कबूल केलं. या चुकीमुळं त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं," असंही तो म्हणाला.

मिहीरनं ढोसले होते इतके पेग : एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मिहीर शाह यानं मोठ्या प्रमाणात मद्यपान केलं होतं. मिहीर त्याच्या तीन मित्रांसह जुहू इथल्या वाईस ग्लोबल बारमध्ये गेला. इथं त्यानं दारूचे चार मोठे पॅक घेतले. मद्यपान केल्यानंतर, मिहीरनं त्याच्या तीन मित्रांना बोरिवली इथं त्यांच्या घरी सोडलं. त्यानंतर मिहीर स्वतःच्या घरी आला. घरी त्यानं आपली मर्सीडीज कार ठेवली आणि बीएमडब्ल्यू घेऊन मरीन ड्राइव्हकडं निघाला.

मालाडमध्ये ढोसले चार बियरचे कॅन : मरीन ड्राईव्हला जाताना मिहीरनं मालाड हायवेवर एका दुकानात थांबून बिअरचे चार कॅन घेतले. कारमध्ये बिअरचे हे चार कॅन मिहीर ढोसले. त्यावेळी राजऋषी बिदावत कार चालवत होता. परंतु मरीन ड्राइव्हवर थोडा वेळ बसल्यानंतर लघुशंका करून मिहीरनं घरी परत निघाल्यावर कार स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला. नंतर वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीरच्या कारनं अॅक्टिव्हाला धडक दिली. यावेळी कावेरी नाखवा ही महिला कारच्या बंपरमध्ये अडकली. मात्र मिहीरनं तिला 1.5 किलोमीटरपर्यंत तसंच ढकलत नेल्याचा दावा पीडितांकडून करण्यात येत आहे. मिहीरनं चौकशीदरम्यान सांगितले की, "ऍक्टिव्हाला धडक दिल्यानंतर ती महिला बंपरमध्ये अडकली, याची आपल्याला माहिती नव्हती. जेव्हा स्पीड ब्रेकरजवळ धक्के जाणवले, तेव्हाच काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं. यावेळी तपासणी केली असता, ती महिला बंपरमध्ये अडकलेली दिसली."

आता पोलीस घेणार केस कापणाऱ्याचा शोध : महिला अडकल्याचं लक्षात येताच त्यांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत कारचा टायर तिच्या पायावरुन गेला. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "चौकशीदरम्यान मिहीरनं आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला. "तो आणि त्याचं कुटुंब घाबरलं होतं, त्यामुळेच ते बोरिवली येथील घरातून पळून गेले. अपघातानंतर लोकांकडून आपल्यावर हल्ला होण्याची भीती मिहीर आणि त्याच्या कुटुंबीयांना होती. विरारला ज्या न्हाव्याकडं मिहीरनं दाढी केली, केस कापले, त्या न्हाव्याचा उद्या पोलीस शोध घेणार आहेत." एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "जुहूतील बारमध्ये मिहीर आणि त्याचे मित्र मद्यपान करत होते, तिथं मिहिरचा मित्र ध्रुव वारंवार येत होता. त्यानं बार कर्मचाऱ्यांना खात्री दिली की ते सर्व 25 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यानंतर त्यांना दारू देण्यात आली. ध्रुवनं बार कर्मचाऱ्यांना त्याचं आधार कार्ड दाखवलं, ज्यावर तो 27 वर्षांचा असल्याचं दर्शवलं." दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी असलेला BMW चा चालक राजऋषी बिडावतची शिवडी कोर्टानं न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर राजऋषी बिडावतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

हेही वाचा :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case
  2. वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पीडित कुटुंबाला 10 लाख देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Worli hit and run case
  3. "मिहिर शहा हा राक्षसच..."; वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी घेतली भेट - Worli Hit and Run

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.