नागपूर Ravindra Singhal On Action Mode : पोलिसांनी शहरातील गुंडांची ओळख परेड घेतली आहे. नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांची पडताळणी सुरू केलीय.
आरोपींची केली पडताळणी : शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात शहरातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, संघठीत टोळीचे सदस्य, घरफोडी, चोरी करणारे तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सर्व आरोपींना पडताळणी करीता बोलावण्यात करण्यात आलं होतं.
कायदा हातात घेतल्यास... : पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली. गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थीती, त्यांचा काम धंदा कोणता सुरू आहे. याबाबत विचारपूस केली. यावेळी पोलीस आयुक्त यांनी गुन्हेगारांना मार्गदर्शन केलं. तसेच कायदा हातात न घेण्याची समज आणि सूचना दिल्या. कोणतंही बेकायदेशीर कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सक्त ताकीद ही दिली.
या गुन्हेगारांची झाली पडताळणी परेड : नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी गुन्हेगार सुद्धा मोठ्या संख्येनं हजर होते. ज्यामध्ये अश्विन लक्ष्मण रामासे, रविन्द्र माणिराव उईके, राहुल अनिल खोब्रागडे, अब्दुल करीम शेख, राकेश गणेश हेडाऊसह शेकडो गुन्हेगारांचा समावेश आहे.
नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना : गेल्या दोन माहिन्यात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना घडल्या होत्या. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी भागात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर दुसरी घटना ही कन्हान पोलीस ठाणे (kanhan police station) हद्दीत घडली होती. यामध्ये संशयावरुन नवऱ्यानं पत्नीची हत्या केली होती. दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
हेही वाचा -