ETV Bharat / state

अतिक्रमण हटवण्यावरुन तणाव; जमावाची पोलिसांवर दगडफेक, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या - Stone Pelted On Police

Stone Pelted On Police : विश्रांत नगर भागातील अतिक्रमण काढत असताना बुधवारी मोठा राडा झालाय. महापालिका आणि पोलीस प्रशासन विश्रांती नगर इथं मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झाले होते. मात्र अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. शेवटी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

Chhatrapati Sambhajinagar News
अतिक्रमण काढताना जमावाची दगडफेक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 9:08 AM IST

अतिक्रमण काढताना जमावाची दगडफेक

छत्रपती संभाजीनगर Stone Pelted On Police : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन (Mukundwadi Railway Station) जवळील विश्रांती नगर इथलं अतिक्रमण हटवताना जमावानं दगडफेक केली. महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर नागरिकांनी अचानक दगडफेक केल्यानं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत महापालिका अधिकाऱ्यांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत.

जमावानं केला हल्ला : याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर इथं अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आलं होतं. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह तिथं दाखल झालं होतं. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या केला. यावेळी महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांसह पाच ते सहा जेसीबी, अग्निशामक दलाच्या गाड्या, दंगल नियंत्रण पथक यासह मोठा फौजफाटा घटनास्थळावर तैनात करण्यात आला होता. कारवाई सुरू करताना जमावानं दगडफेक करण्यास सुरू केल्यानं वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

मनपानं काढल्या १२५ मालमत्ता : बुधवारी विश्रांती नगर ते झेंडा चौक रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी आठ तासाचा वेळ लागला. जवळपास १२५ मालमत्ता निष्कासित केल्या. कारवाई दरम्यान नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत महापालिका इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे यांच्यासह, दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. महापालिका उर्वरित कारवाई गुरुवारीही सुरू ठेवणार असल्याची माहिती, मनपाचे उपायुक्त सौरव जौशी यांनी दिली.

संसार वाचवण्यासाठी धावाधाव : सुमारे दोनशे ते सव्वादोनशे घरांवर ही कारवाई होणार आहे. या भागात हातावर पोट असलेले सर्वसामान्य नागरिक राहतात. महापालिकेची कारवाई सुरू होताच संसार वाचवण्यासाठी त्यांची पळापळ सुरू झाली होती. सर्वत्र आक्रोश सुरू होता. लहान मुलं, महिला अक्षरक्षः डोळ्यातून अश्रू गाळत आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा -

  1. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला; चालकानं सांगितला हल्ल्याचा थरार
  2. मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त
  3. Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.