ETV Bharat / state

आधुनिक शिक्षणाला मिळणार पारंपरिक शिक्षणाची जोड; पतंजली समूहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात होणार बदल - Traditional education

Traditional Education For Students : पतंजली समूह आणि भारतीय शिक्षा बोर्ड विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षात दाखल करणार आहे.

Patanjali and Bhartiya Shiksha Board add Knowledge of Indian culture in curriculum of students in new academic year
विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा अभ्यासक्रम (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 1:04 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Traditional Education For Students : दिवसेंदिवस देशात शिक्षण प्रणाली बदलत चाललीय. सीबीएससी, आयसीएसई अशा अभ्यासक्रमात आता भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षात दाखल होणार आहे. वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं आणि औषधं बाजारात आणणाऱ्या पतंजलीनं आता शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकलय. भारत सरकारनं पतंजली समूहाच्या माध्यमातून भारतीय शिक्षा बोर्डाला परवानगी दिली आहे. यात भारतीय संस्कृती विषयी अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाणार आहे. पहिली ते बारावी या वर्गांमध्ये आधुनिक शिक्षणासह पारंपरिक शिक्षणाची जोड या निमित्तानं दिली जाणार असून याबाबत सर्व शाळांसोबत बैठक घेऊन पुढील वर्षी अभ्यासक्रम अंमलात आणला जाणार आहे.

भारतीय शिक्षा बोर्ड कार्याध्यक्ष एन पी सिंग आणि मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव (ETV Bharat Reporter)

आधुनिक अभ्यासासह प्राचीन अभ्यासाची जोड : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना भारतीय शिक्षा बोर्ड कार्याध्यक्ष एन पी सिंग म्हणाले, "जगात भारताची एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते. एकेकाळी गुरुकुल पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्राचीन शिक्षण पद्धती अंमलात आणली जायची. त्या काळात जगात भारत देश बुद्धिमत्ता आणि संस्कृती असलेला सर्वश्रेष्ठ मानला जायचा. मात्र, हळू-हळू पाश्चिमात्य संस्कृती देशात रुजू झाली आणि त्यामुळं काही प्रमाणात भारतीय संस्कृतीचा विसर पडायला लागला. त्यामुळंच भारत सरकारनं भारतीय शिक्षा बोर्ड तयार केला असून पतंजली समूहाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम शाळांमध्ये उपलब्ध असणार आहे. आधुनिक अभ्यासासह प्राचीन अभ्यासाची जोड देत, नवीन अभ्यासक्रम मुलांसाठी लागू करण्यात येईल.

शाळांची बैठक घेऊन लवकरच अभ्यासक्रम होणार सुरू : भारतीय शिक्षा बोर्डच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम अंमलात आणण्यासाठी तयारी सुरू झालीय. 2025-26 या शैक्षणिक वर्षात देशातील बहुतांश शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत. त्यासाठीची एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये नुकतीच पार पडलीय. प्रत्येक विभागात बैठक घेऊन, सर्व स्थानिक शाळांना या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी शाळांना वेगळी मान्यता घ्यावी लागेल. मात्र, त्याआधी यासंबंधीचा अभ्यासक्रम शाळांना जाणून घ्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर एकाच वेळेस एसएससी बोर्ड आणि सीबीएससी बोर्ड अभ्यासक्रम एकाच शाळेत सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे. पालकांना परवडावी यासाठी कमी किंमतीत पुस्तक बाजारात उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशाची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी हा विशेष प्रयत्न केला जात असल्याचंही, सिंग यांनी सांगितलं.

इंग्रजांनी केली होती शिक्षण पद्धती उध्वस्त : यावेळी बोलताना मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव म्हणाले, "देशाची संस्कृती आणि परंपरा ही प्राचीन काळातील अभ्यासाचं मूळ होतं. मात्र, जे मुघलांना जमलं नाही ते ब्रिटिशांनी करून दाखवत सगळी शिक्षण प्रणाली उध्वस्त केली. भारत हा संस्कृती जपणारा आदर्शवादी देश होता आणि याला तोडायचं तर याची शिक्षण पद्धती मोडकळीस आणली पाहिजे असं मत 1853 यावर्षी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये लॉर्ड मेकॉलनं व्यक्त केलं होतं. तसंच गुरुकुल पद्धती उध्वस्त करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता, आणि आता ते होतंय. पाश्चिमात्य अभ्यासक्रम अंगीकारताना प्राचीन काळातील अभ्यासाचा सर्वांना विसर पडायला लागलाय. त्यामुळंच पुढील वर्षापासून आधुनिक अभ्यासासह प्राचीन गणित, वैदिक गणित, प्राचीन विज्ञान यासह संस्कृती दर्शवणारा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे."

हेही वाचा -

  1. Patanjali False Advertising case : पतंजली जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली योगगुरू बाबा रामदेव यांना नोटीस
  2. बाबा रामदेव यांना 'सर्वोच्च' धक्का: 'कारवाईला तयार राहा,' सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं - SC Rejects Baba Ramdev Apology
  3. पारंपरिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांकडं विद्यार्थ्यांची पाठ; नवीन शैक्षणिक धोरण कसं होणार यशस्वी? - Amravati Education News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.