कोल्हापूर Swapnil Kusale : तब्बल 72 वर्षाचा वैयक्तिक पदकाचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी कांस्यपदक पटकावत साता-समुद्रापार तिरंगा फडकवला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्याच्या गावी कांबळवाडीत जल्लोषाला उधाण आलंय. ऑलम्पिक स्पर्धेत कास्यपदक पटकवल्यानंतर स्वप्नीलची आई अनिता कुसाळे यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलंय. यावेळी त्यांनी स्वप्निल घरी आल्यावर लाडक्या लेकासाठी आवडती बाजरीची भाकरी तसंच मेथीची भाजी, असा खास बेत करणार असल्याचं सांगितलं.
ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अगदी अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमस स्वप्निल कुसाळे यांनी चमकदार कामगिरी करत कास्यपदक पटकावलं. त्याच्या यशानंतर त्यांच्या कुटुंबानं आनंद व्यक्त केला. स्वप्निल यांच्या आईला अश्रू थांबत नव्हते, तर आजी तुळसाबाई यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा अखंड जप सुरू ठेवला होता. अंतिम सामन्यानंतर कांस्य पदक मिळवल्याचं समजताच कुटुंबाच्या आनंद गगनात मावेनासा झाला. आजीनं आपल्या नातवाला गोंजारणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. स्वप्नीलच्या घवघवीत यशानंतर सगळं कुटुंब भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
मित्रांन मिळवलं दैदीप्यमान यश : पहिल्याच ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धेत मित्र स्वप्नील कोसळे यांना दैदीप्यमान यश मिळवत गावासह देशाचं नाव जगात गाजवलं. लहानपणापासूनच त्यांनी ठेवलेली जिद्द, प्रामाणिक मेहनतीच्या बळावर त्यांनी यशं पूर्ण केलं. आम्ही एकाच बेंचवर पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यामुळं मित्राची जल्लोषात मिरवणूक काढणार असं, वर्गमित्र दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं.
'हे' वाचंलत का :
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये 72 वर्षांनी महाराष्ट्राचा डंका वाजवणाऱ्या स्वप्नीलला मुख्यमंत्र्यांकडून मोठं बक्षीस - Paris Olympics 2024
- सात्विक-चिरागचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं; उपांत्यपूर्व सामन्यात पराभव - Paris Olympics 2024