नाशिक Panchavati Express Coupling Break : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्टेशनजवळ मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याची घटना घडली. आज (6 जुलै) सकाळी घडलेल्या घटनेत एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानं इंजिन आणि एक बोगी पुढं मुंबईच्या दिशेनं निघून गेली. काही अंतरावर जाऊन इंजिन आणि बोगी थांबली. इंजिन आणि एक बोगी पुढं गेल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, सुदैवानं यादरम्यान कोणतीही जीवितहानी आणि दुखापत न झाल्यानं प्रवाशांनी निश्वास सोडला.
कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली (Source reporter) नाशिकहून पंचवटी एक्स्प्रेसमधून हजारो चाकरमानी मनमाड ते मुंबई असा रोज प्रवास करून ये-जा करत असतात. सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास कसारा स्टेशनजवळ पंचवटी एक्स्प्रेसच्या तीन आणि चार नंबरच्या बोगीचे कपलिंग निघालं आणि इंजिनपासून हे डबे वेगळे झाले. यावेळी इंजिन चालकानं थोड्या अंतरावर गाडी थांबवल्यानं पुढील धोका टळला. त्यानंतर तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत डब्यांची इंजिनासोबतच्या डब्याशी जुळवाजुळव केली आणि 40 मिनिटांत एक्सप्रेस पुन्हा सुरू झाली. त्यानंतर ही गाडी मुंबईकडं मार्गस्थ झाली. तसंच रेल्वे प्रशासनानं वेळोवेळी गाड्यांचा मेंटनंस केल्यास अशा घटना टाळता येतील, असं रेल्वे प्रवाशी संघटनेनं म्हटलंय. हेही वाचा -
- Travel With Umbrellas : पंचवटीच्या एसी बोगी मधे पाऊस; छत्री धरुन प्रवास करतात प्रवासी