ETV Bharat / state

पालघरमध्ये कोण उधळणार विजयी गुलाल? - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Lok Sabha Election Results 2024 : पालघर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात 63.91% मतदान झालं होतं. या मतदारसंघात लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती, बहुजन विकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळतेय.

Lok Sabha Election Results 2024
लोकसभा निवडणूक निकाल 2024 (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:46 AM IST

पालघर Lok Sabha Election Results 2024 : शहरी आणि आदिवासी भागांचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभा मतदार संघात बहुरंगी लढत असली तरी, महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत पाहायला मिळतेय. महायुतीकडून भाजपाचे हेमंत सावरा, शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील रिंगणात आहेत. मात्र, गुलाल कोण उधळणार हे काही तासात कळणार आहे.

पालघर लोकसभा मतमोजणी : पालघर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यामधे पोस्टल मतदान 3 हजार 516 इतकं आहे. मतमोजणीसाठी एकूण 106 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा निहाय 98 टेबल ठेवण्यात आले आहेत. तर पोस्टल बॅलेटसाठी 7 आणि सर्व्हिस वोटर्सच्या मोजणीसाठी 1 टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी दोन केंद्रीय मतमोजणी निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित आहेत. मतमोजणीची प्रक्रिया 29 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. सर्वात कमी फेऱ्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. सर्वाधिक फेऱ्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. पालघर लोकसभेसाठी एकूण 21 लाख 48 हजार 514 मतदार आहेत. यापैकी 13 लाख 73 हजार 162 मतदारांनी मतदान केलं आहे. यामधे पोस्टल मतदान 3 हजार 516 आहे. पालघर लोकसभेसाठी एकूण 63.91% मतदान झालं आहे. निवडणुकीसाठी दहा उमेदवार रिंगणात असून तिरंगी लढत होत आहे.

लोकसभेसाठी पालघरमध्ये चुरस : लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात पक्ष आणि उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. असंच चित्र आदल्या दिवशीपर्यंत पालघर मतदारसंघात पहायला मिळालं होतं. त्यामुळं विधानसभेसाठीही असंच चित्र राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पहिलं नाव जाहीर झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. याउलट बविआनं फक्त दोन दिवस बाकी असताना आपला उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळं आता विधानसभेत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपाचे चिंतामण वनगा यांनी विजय मिळवला होता. तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झाले होते. 2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केलं होतं. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यानंतर गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केलाल होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना एकूण मतांपैकी 48.30 टक्के म्हणजेच 5 लाख 15 हजार मते मिळाली होती. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 46.90 टक्के म्हणजे 4 लाख 19 हजार 596 मते मिळाली होती. गावित 23 हजार 404 मतांनी विजयी झाले होते.

विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल :

  1. डहाणू - विनोद निकोले - कम्युनिस्ट पक्ष
  2. पालघर - श्रीनिवास वनगा - शिवसेना (शिंदे गट)
  3. विक्रमगड - सुनील भुसारा - राष्ट्रवादी (शरद पवार गट)
  4. बोईसर - राजेश पाटील - बविआ
  5. नालासोपारा - क्षितिज ठाकूर - बविआ
  6. वसई - हितेंद्र ठाकूर - बविआ

हे वाचलंत का :

  1. राज्यात पहिल्या कलांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, सुप्रिया सुळे आघाडीवर - Maharashtra lok Sabha election
  2. महाराष्ट्राकडे अवघ्या देशाचे लक्ष; राज्यातील 48 मतदारसंघातील संभाव्य विजयी उमेदवारांची लिस्ट वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election Results 2024
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2024 : देशात सत्तापरिवर्तन होणार? मतमोजणी सुरु, पोस्ट बॅलेटमध्ये एनडीए आघाडीवर - Lok Sabha election results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.