ETV Bharat / state

कांद्याचे दर घसरले; सोलापूर मार्केट यार्डात दोन हजार गाड्या भरून कांद्याची आवक - कांद्याचे दर घसरले

Onion Prices Fell : केंद्र सरकारानं कांद्याची निर्यातबंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Solapur Market Yard) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं आज (25 जानेवारी) कांद्याचे दर जबरदस्त घसरले होते. (Onion Grower Farmers) यामुळे येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.

Onion Prices Fell
कांदा व्यापारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 6:17 PM IST

कांद्याचे दर घसरल्यानं संतप्त भावना व्यक्त करताना कांदा व्यापारी आणि शेतकरी

सोलापूर Onion Prices Fell : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं आज (25 जानेवारी) कांद्याचे दर जबरदस्त घसरले होते. (Solapur APMC) मार्केट यार्डात आलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. (Agricultural Produce Market Committee) यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्येही रोषाचं वातावरण दिसून आलं.

शेतकऱ्यांकडून व्यथा मांडण्याचा प्रयत्न : केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीचं मुख्य प्रवेशद्वारच बंद करून वाहतूक कोंडी केली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केलं. गुरुवारी दिवसभर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.

दोन हजार गाड्यांची आवक झाल्यानं कांद्याचे दर घसरले : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. जवळपास दोन हजार गाड्यात कांदा भरून शेतकऱ्यांनी कांदा आणला. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं कांदा दर दोन ते तीन रुपये प्रतिकिलो मिळाला आहे. एका एकरात कांदा उत्पादन करण्यासाठी जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो. तर कांदा विकून हातात तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.

कांदा रिकामा करण्यासाठी जागाच नाही : कांदा लागवडीतून जवळपास वीस ते तीस हजार रुपये एका एकरात नुकसान होत आहे. कांद्याची अनेक वाहने सोलापूर-हैदराबाद महामार्गावर रांगेत थांबून आहेत. कारण सोलापूर मार्केट यार्डात कांदा वाहनांतून रिकामा करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.

मार्केट यार्डाचं मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन : सोलापूर मार्केट यार्डात कांदा घेऊन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली. गुरुवारी सकाळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करून 'रास्ता रोको' करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा:

  1. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  2. महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक; 'वंचित'चा संजय राऊतांवर हल्लाबोल, निमंत्रण नसल्याचं केलं स्पष्ट
  3. पालघरमधील विविध प्रकल्पांत शेतकऱ्यांची फसवणूक, प्रकल्प बंद पाडण्याचा आमदार राजेश पाटील यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.