ETV Bharat / state

गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होताय तर डोळ्यांची घ्या काळजी; 'लेझर शो'मुळं कोल्हापुरात दोघांच्या डोळ्यांना दुखापत - Laser Effects on Eyes

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 4:23 PM IST

Updated : Sep 8, 2024, 5:13 PM IST

Laser Effects on Eyes : शनिवारी राज्यभरात ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन (Ganpati Aagman) झालं. अशातचं कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली. गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळं (Laser Light) दोघांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

Ganpati Aagman Miravnuk In Kolhapur
मिरवणुकीतील लेसर किरण (ETV BHARAT Reporter)

कोल्हापूर Laser Effects on Eyes : शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. मात्र, आगमनाच्या वेळी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. मिरवणुकीत झगमगाट, आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या 'लेझर शो' (Laser Light) पाहायला आलेल्या कोल्हापुरातील उचगावमधील तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला, तर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली. दोघांनाही उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रतिक्रिया देताना जखमी मुलाचे वडील पांडुरंग बोडके (ETV BHARAT Reporter)

तरुणाच्या डोळ्याला झाली जखम : कोल्हापुरात डॉल्बीचा दणदणाट आणि आसमंत व्यापून टाकणाऱया 'लेझर शो'च्या झगमगटात शनिवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका निघाल्या होत्या, याच आगमन सोहळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली. 'लेझर शो'च्या किरणांमुळं मिरवणूक पाहायला गेलेल्या 21 वर्षाच्या तरुणाच्या डोळ्याला जखम झाली. आदित्य बोडके असं या तरुणाचं नाव आहे.

डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया : उचगावमध्ये 'डीजे' लावत लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी आदित्य तिथे गेला होता. तेथील लेझरमुळंच आदित्यच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. 'लेझर शो' पाहिल्यांनंतर तासाभरात या तरुणाला डोळ्यात जळजळ जाणवू लागली. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या तरुणाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं,

पोलीस कर्मचाऱयाचा डोळ्याचा सूज : कोल्हापूरमध्ये अशीच एक दुसरी घटना समोर आली. आगमन मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाली. त्यांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

'इतक्या' रुग्णांना धोकादायक 'लेझर'चा त्रास : दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात 'लेझर शो'मुळं डोळ्यांना इजा झालेल्या 70 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या धोक्यापासून बरे होणाऱ्यांची संख्या जरी चांगली असली तरी डोळ्यांच्या रेटिनामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे रुग्ण अधिक होते. गतवर्षीही 40 रुग्णांना धोकादायक लेझरचा त्रास झाला. आता यंदा लेझर किरणांमध्ये आधुनिकता आणून त्याची तीव्रता वाढवल्यामुळं डोळ्याला या आधुनिक लेझर किरणांचा सर्वाधिक धोका आहे, असं डॉक्टर सांगतात.

धोकादायक लेझरवर कायमची बंदी आणा : "लेझर किरणांची तीव्रता अधिक असल्यामुळं रेटिनाला सर्वाधिक धोका आहे. अशा मिरवणुका टाळणं किंवा या किरणांकडं बघूच नये, अशी दक्षता घ्यायला हवी. शासनानं या धोकादायक लेझर किरणांच्या वापरावर तत्काळ बंदी घालावी," असं मत कोल्हापुरातील नेत्र विकारतज्ञ डॉ. चिंतामणी खरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. लाडके बाप्पा विराजमान! राज्यभरात ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन; आनंदपर्वाची सुरुवात - Ganeshotsav 2024
  2. पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'स्त्री शक्ती'चा जागर; 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण अन् महाआरती - Ganeshotsav 2024
  3. अंबानगरीत गणरायाचं थाटात आगमन; 'नाळ'मधील चैतूनं गणेशभक्तांना केलं 'हे' आवाहन - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 8, 2024, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.