ETV Bharat / state

दत्तपूर गावाने वटसावित्री पौर्णिमा केली अनोख्या पद्धतीनं साजरी, सुवासिनी महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून घेतली शपथ - Vatsavitri Purnima Buldhana - VATSAVITRI PURNIMA BULDHANA

Vatsavitri Purnima Buldhana : वटसावित्री पौर्णिमा सुवासिनींचा सण. सुवासिनी महिला वडाच्या झाडाला फेरे घेत असतात; मात्र आज बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर या गावातील महिला व पुरुषांनी अनोखी शपथ घेतली आहे. एखादी महिला विधवा झाली तर बांगड्या फोडायच्या नाही; पण त्या महिलेला मानसन्मान द्यायचा, अशा प्रकारची एक शपथ घेत या महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून वडाच्या झाडाला फेरे मारत शपथ घेतली आहे.

Vatsavitri Purnima Buldhana
वटसावित्री पौर्णिमेला सुवासिनी महिला शपथ घेताना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 9:24 PM IST

Updated : Jun 21, 2024, 9:37 PM IST

बुलढाणा Vatsavitri Purnima Buldhana : जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. आज हा उत्सव सर्वत्र साजरा झाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मागणे मागतात; मात्र ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे, अशा विधवांना या समारंभापासून दूर ठेवले जाते. असे असले तरी सामाजिक चालीरीतीला फाटा देत दत्तपूर गावाने सामाजिक आदर्श उभा करीत सुवासिनींनी विधवांना कुंकू लावले, त्यांचे पूजन केले आणि आपल्या सोबत त्यांनाही वटसावित्री पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. सामाजिक बदलाचे पाऊल ठरणारा हा अनोखा कार्यक्रम दत्तपूरच्या मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणातील वडाच्या झाडाखाली आज पार पडला.

विधवा प्रथा बंद करण्याची शपथ घेताना गावातील महिला (ETV Bharat Reporter)

विधवा महिलाही झाल्या कार्यक्रमात सहभागी : दत्तपूर गाव हे आदर्श गाव मानले गेले आहे. स्वच्छतेचा आदर्श याच गावाने जिल्ह्यापुढे घालून दिला. तसा आज सामाजिक सुधारणेचा आदर्शही इथेच पाहायला मिळाला. मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराच्यावतीने प्रा. डी एस लहाने यांनी विधवा महिलांसाठी मैलाचा दगड ठरावा असे प्रयत्न सुरू केले आहे. प्रा. लहाने, पत्रकार गणेश निकम, प्रा. शाहिना पठाण, अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर, प्रज्ञा लांजेवार, गजानन मुळे, संदीप जाधव, गौरव देशमुख आणि बहुसंख्य पत्रकारांची टीम आज सकाळी दत्तपूर गावात पोहोचली. यावेळी विधवा महिलांनाही कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे आवाहन प्रा. लहाने यांनी ग्रामस्थांना केले. त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद देत दत्तपूरचे सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांनी विधवा भगिनींना शाळेच्या पारावर जमा केले. यावेळी गावातील सुवासिनी महिलांनी विधवा भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी करून घेत त्यांना कुंकू लावले.

उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट : विधवेला कुंकू लावणे ही तर बदलाची नांदी ठरावी. पूजेचे ताट त्यांच्या हाती देत वटसावित्रीचा विधी करून घेतला आणि वडाच्या झाडाला सोबत सोबत फेऱ्या मारल्या. हा अनोखा कार्यक्रम घडून आला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला होता. या कार्यक्रमांमध्ये नुकतचं लग्न झालेल्या नवीन मुलींपासून तर वय वर्ष 70 पर्यंतच्या महिला सहभागी झाल्या. जेव्हा पूजेचे ताट विधवांच्या हातात दिले तेव्हा अनेक विधवा भगिनींनी हा आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलं. यावेळी विधवा प्रथा न पाळण्याची शपथ वटसावित्री पौर्णिमेच्या समारंभात सहभागी झालेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी घेतली. प्राध्यापक शहीना पठाण यांनी ही शपथ दिली.

सण उत्सवात त्यांनाही सहभागी करूया : एखाद्या महिलेचा पती वारला असेल तर त्यामध्ये तिचा दोष नसतो. तिचं सौंदर्य लेणं काढून तिला विद्रुप करणं आणि सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत करणं योग्य नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून विधवा महिलांनाही सन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे. यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रा. डी एस लहाने यावेळी बोलताना म्हणाले.

वटसावित्री व्रताचे महत्त्व : वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यानं देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जाते.

हेही वाचा:

  1. "भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला" : NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी, पेपरफुटी विरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन - Chikhal Pheko Aandolan
  2. 'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper
  3. कोणी मैदान देतं का मैदान? मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण; पोलीस भरती ढकलली पुढं - Maharashtra Police Recruitment

Last Updated : Jun 21, 2024, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.