नागपूर Lok Sabha Election 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंचाचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे करत आहेत. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 2014 साली माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, तर 2019 च्या निवडणुकीत वर्तमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नितीन गडकरी यांनी पराभव केला होता.
लोकसंख्या : नागपूर शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 35 ते 37 लाखांचा घरात आहे. 2014 च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 12 मतदार संघात एकूण 37 लाख 4 हजार 676 मतदार असून त्यापैकी 19 लाख 28 हजार 286 पुरुष मतदार आहेत, तर 17 लाख 76 हजार 337 महिला मतदार आहेत.
चार विधानसभा क्षेत्र भाजपच्या ताब्यात : नागपूर लोकसभा मतदार संघात शहरातील 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र भाजपाच्या ताब्यात आहेत. दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर महानगर पालिकेत अनेक वर्षे भाजपाची सत्ता आहे. जिल्हापरिषद,पंचायत समिती या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघ शहरी असल्यानं यामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर, दक्षिण, मध्य, दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
जातीनिहाय समीकरण : नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी, हलबा या जातींचं प्राबल्य आहे. यात मुस्लिम, दलित काही प्रमाणात कुणबी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार सर्वाधिक आहेत. त्यामध्ये तेली, कुणबी मतदारांची संख्या अधिक आहे. दोन्ही समाजाची मते सरासरी 40 ते 50 टक्के आहेत. त्यानंतर बौद्ध, हलबा समाज देखील 30 टक्के आहे, तर मुस्लिम मतदारांची अंदाजे संख्या ही 10 टक्के आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. त्यामुळं भाजपाला संघाचे पाठबळ आहे.
नागपूर लोकसभा खासदार : नितीन गडकरी 2014 आणि 2019 ला निवडून आले आहेत. 2019 साली नागपूर लोकसभा निवडणुकीत 55 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2019 मध्ये नितीन गडकरी यांनी तब्बल सव्वा 2 लाख हजाराच्या मताधिक्यानं नाना पटोले यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये नितीन गडकरी यांनी तब्बल 2 लाख 86 हजाराच्या मताधिक्यानं मुत्तेमवारांचा पराभव केला होता. सध्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे यांच्यात जोरदार लढत होणार आहे.
काय आहेत नागपूच्या समस्या : नागपूर लोकसभा मतदारसंघ हा 95 टक्के शिक्षित आहे. त्यामुळं रोजगाराचा प्रश्न इथे महत्वाचा आहे. मुत्तेमवारांच्या काळात नागपूरला मिहान सारखा प्रकल्प आला खरा, पण मिहानचा पाहिजे तसा विकास झाला नाही. गडकरींच्या काळात मिहानचा विकास झाला पण, रोजगार उपलब्ध झाला नाही. गडकरींच्या काळातही मिहानचा विकास झालेला नाही. त्यामुळं याचा रोजगारावर थेट परिमाण झाला. मिहानमध्ये लाखो तरुणांना काम दिल्याचा दावा गडकरी करत आहेत. नागपूर शहराच्या आऊटर भागात पाण्याचं संकट कायम आहे, शहरात 24 तास पाणी देण्याचा दावा गडकरी करतात. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचेच भूमिपुत्र आहेत. तर दुसरीकडं काँग्रेसमधील गटबाजीमुळं आज काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. मुत्तेमवार गट, नितीन राऊत गट, राजेंद्र मुळक गट यासह लहान मोठे देखील गट सक्रिय आहेत. ज्यामुळं नागपुरात काँग्रेस विखुरलेली आहे. सर्व गटातटांना एकत्रित करण्याचं नाना पटोले यांच्यासमोर आव्हान आहे.
हे वाचलंत का :
- भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना धमकी; दाऊद, छोटा शकील टोळीकडून अमेरिकेतून आला फोन - Eknath Khadse
- शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head
- प्रकाश आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदार संघात एमआयएमचा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसींचा मनोज जरांगेंना 'हा' सल्ला - Lok Sabha Election 2024