ETV Bharat / state

देशात 'स्मार्ट सिटी' नव्हे तर 'स्मार्ट व्हिलेज'ची गरज; नितीन गडकरींची भूमिका - Nitin Gadkari On Smart Village

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 7:51 PM IST

Nitin Gadkari On Smart Village : राज्यातील अनेक शहरांची रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं देशात ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) नाही, तर ‘स्मार्ट व्हिलेज’ (Smart Village) झाले पाहिजेत,’ अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली.

Nitin Gadkari On Smart Village
मंत्री नितीन गडकरी (ETV BHARAT Reporter)

पुणे Nitin Gadkari On Smart Village : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'स्मार्ट सिटी' (Smart City) प्रकल्पानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशात 'स्मार्ट सिटी' नव्हे तर 'स्मार्ट व्हिलेज'ची गरज असल्याचं सांगितलं. पुण्यात आयोजित 'सीओईपी अभिमान पुरस्कार' सोहळ्यात गडकरी पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगलच्या आधारावर नवीन तंत्रज्ञान दिलं तर खूप काही करण्यासारखं आहे.

कृषी क्षेत्रात अनेक संधी : नितीन गडकरी म्हणाले, "शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या आहेत. आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास, ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील. त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील". कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी केवळ पंधरा ते सोळा टक्के आहे. ते योगदान वाढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे आपल्याला शक्य आहे. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (ETV BHARAT Reporter)

'स्मार्ट सिटी' सोबतच 'स्मार्ट व्हिलेज' : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्यात वाढवून आयात कमी करावी लागेल. इथेनॉल, बायोइथेनॉल आदी पर्यायांचा वापर करून पेट्रोल आणि डिझेलसाठी होणारा खर्च आपण वाचवू शकतो. तो पैसा देशाच्या इतर विकासाच्या कामात उपयोगात आणू शकतो. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य हा आपल्या प्रगतीचा मूलमंत्र असला पाहिजे. 'स्मार्ट सिटी' सोबतच 'स्मार्ट व्हिलेज' ही संकल्पना अस्तित्वात आणावी लागेल. सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर हे संशोधनाचं आणि तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं यावेळी गडकरी म्हणाले.

आजही सुमारे ६५ टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि कृषी अर्थव्यवस्था हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्तोत आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला आपणास पाठबळ द्यावेच लागेल. कारण कृषी अर्थव्यवस्थेला अव्हेरून आत्मनिर्भर भारतचं स्वप्न पूर्ण होणार नाही. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

लवकरच मुंबई-बंगळुरू १४ लेन महामार्ग : पुढील सहा महिन्यात मुंबई-बंगळुरू या १४ लेन महामार्गाचं काम सुरू होणार आहे. मुंबईतील अटल सेतू उतरला की, थेट एक्स्प्रेस महामार्गाला लागता येणार आहे. हा महामार्ग थेट रिंग रोडशी जोडलेला असेल आणि यामुळं मुंबई-बंगळुरू प्रवास अधिक गतीनं करता येईल. तसंच पुणे-औरंगाबाद हे अंतर केवळ दोन तासांवर येईल, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

यंदाचे पुरस्कार मानकरी : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी टेक) आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीनं देण्यात येणारा, 'सीओईपी अभिमान पुरस्कार' देश आणि परदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना देण्यात आला. आज अभियंता दिनाचं औचित्य साधून नितीन गडकरी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यंदाचा 'सीओईपी जीवनगौरव पुरस्कार' अहमदाबाद येथील भगवती स्फेरोकास्ट प्रा. लि. चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांच्यावतीनं लोहिया यांनी स्वीकारला. तर यंदाच्या सीओईपी अभिमान पुरस्काराने अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव आयएएस अधिकारी प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील 'जे.पी. मॉर्गन चेस'च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना देण्यात आला.

हेही वाचा -

  1. 'मला पंतप्रधान पदाची ऑफर, पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं...'; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट - Nitin Gadkari PM Post
  2. पुढील 2 वर्षात पेट्रोल, डिझेलच्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरींनी काय दिले संकेत? - Nitin Gadkari on EVs
  3. ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, नवीन वाहन खरेदीवर मिळणार 25 हजारांची सुट - discounts on passenger vehicles

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.