ETV Bharat / state

उद्धव ठाकरे मातोश्रीत राहणार की तुरुंगात जाणार ? ; नितेश राणेंनी हल्लाबोल करत सांगितला संजय राऊतांचा 'धंदा'

Nitesh Rane On Uddhav Thackeray : उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. "उद्धव ठाकरे 2024 च्या निवडणुकीनंतर मातोश्रीवर राहतात की, कारागृहात जातात ते पाहा," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Nitesh Rane On Uddhav Thackeray
आमदार नितेश राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 9:44 AM IST

पुणे Nitesh Rane On Uddhav Thackeray : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आ नितेश राणे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नेते भाजपामध्ये येतात ते काही लहान मुलं नाहीत. त्यांना भविष्य कुठं घडू शकते याबाबत माहिती आहे. भाजपाशिवाय पर्याय नाही, याची सगळ्यांना जाणीव झाली आहे. म्हणून ते आता निर्णय घेत आहेत. आम्ही कुणाला खेचून आणत नाही." अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींना बोलताना दिली आहे. यावेळी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर त्यांनी हल्लाबोल केला.

अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाची टीका : अशोक चव्हाण यांच्यावर भाजपा नेते टीका करत होते, तेच अता पवित्र झाले, असा प्रश्न नितेश राणे यांना विचारण्यात आला होता. यावर नितेश राणे म्हणाले की, "विरोधक स्वतःच्या आमदाराला सांभाळू शकत नाहीत, जे आरोप झाले त्यावर उत्तर देणं आमचं काम नाही. तुम्ही स्वतःच्या नेत्यांची काळजी घ्या. तुम्ही काळजी घेत नाहीत, म्हणून नेते निर्णय घेत आहेत. आमच्याकडं जे नेते येतात त्या सगळ्यांवर आरोप नाहीत. मिलिंद देवरा यांच्यावर काय आरोप होते. जे नेते येत आहेत त्यांची येण्याची कारणं वेगवेगळी आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर कुठलाच दबाव नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात. आम्ही देखील काँग्रेस सोडताना अनेक कारणं होती."

उद्धव ठाकरे मातोश्रीत राहणार की तुरुंगात जाणार ? : शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चाळीस जागा सुद्धा मिळणार नाहीत, असं म्हटलं आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "2024 नंतर उद्धव ठाकरे मातोश्रीत राहतात, का तुरुंगात जातात ते त्यांनी पाहावं, आम्ही 40 पार करणार आहोतच," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुंडाचे फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंडाचे फोटो असल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "याच लोकांचे फोटो पूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांसोबत आहेत. त्यांच्यासोबत असले की ते गुंड नसतात. त्यामुळं त्यांनी आधी त्यांचं परीक्षण करावं." मुख्यमंत्र्यांची दाढी जाळण्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विचारलं असता, "संजय राऊत यांनी कधी हा धंदा सुरू केला मला माहित नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितेश राणे पुण्यात आले होते, त्या वेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

हेही वाचा :

  1. अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं पाऊस पडेल का? मी अजित पवारांसारखं बोलणार नाही; ठाकरेंचा टोला
  2. संजय राऊतांबाबत बदनामीकारक विधान, भाजपा आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
  3. मग असं बोलताना राऊतांना लाज कशी वाटत नाही? नितेश राणेंचा राऊत कुटुंबावर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.