ETV Bharat / state

इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखेंनी उडवली खिल्ली; शरद पवारांच्या 'या' पठ्ठ्यानं इंग्रजीत घेतली 'खासदारकी'ची शपथ - Nilesh Lanke Oath In English - NILESH LANKE OATH IN ENGLISH

Nilesh Lanke Oath In English : इंग्रजी येत नसल्यानं महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांची खिल्ली उडवली. त्यानंतर निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये धोबीपछाड देत विजय संपादन केला. आता शरद पवार यांच्या या पठ्ठ्यानं इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेऊन सुजय विखे पाटील यांनी उडवलेल्या खिल्लीचा वचपा काढला.

Nilesh Lanke Oath In English
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 2:31 PM IST

हैदराबाद Nilesh Lanke Oath In English : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत इंग्रजीचा मुद्दा चांगलाच गाजला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही, अशी खिल्ली महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उडवली. त्यावर लोकसभा निवडणुकीत चांगलंच रणकंदन झालं. त्यानंतर निवडून आल्यावर निलेश लंके यांनी 'पवार इज द पावर' म्हणत सुजय विखेंचं नाव न घेता टोला लगावला. आता तर निलेश लंकेंनी खासदार झाल्यावर चक्क इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे पाटलांनी उडवलेल्या खिल्लीचा वचपा काढला. त्यामुळे आता सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगणार असल्याचं दिसून येत आहे.

निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इंग्रजी येत नसल्याचा मुद्दा महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उचलला. सुजय विखे पाटील यांनी उडवलेल्या खिल्लीचा जोरदार घाव महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना झाला. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात "सगळ्यांचा नाद करा, मात्र शरद पवार यांचा नाद करू नका, इथं भले भले घरी बसवले" अशी टीका त्यांनी सुजय विखे यांचं नाव न घेता केली. आज लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यात निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेतली. इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवल्याचं निलेश लंकेच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे निलेश लंकेंनी चक्क इंग्रजीतून शपथ घेत हा वचपा काढल्याची चर्चा आता करण्यात येत आहे.

इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखे पाटलांनी उडवली खिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात मोठा वादविवाद झाल्याचं पहायला मिळालं. निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांवर आरोप केल्यानंतर त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी, "50 वर्ष माझ्या परिवाराला नागरिकांनी पाठींबा दिला. माझा परिवार त्यामुळेच राजकारणात काम करत आहे. मी पत्रकार बांधवांना विनंती करतो, की त्यांनी माझी क्लीप माझ्या मित्राला पाठवावी. माझ्या इतकी इंग्रजी निलेश लंके यांनी बोलून दाखवावी, हवं, तर त्यांनी महिनाभर घोकमपट्टी करावी. माझ्या इतकी हिंदी आणि इंग्रजी माझ्या मित्रानं बोलली तर मी फॉर्म भरणार नाही," अशी टीका निलेश लंकेंवर केली. सुजय विखे पाटील यांनी इंग्रजीवरुन केलेली टीका निलेश लंके यांच्या जिव्हारी लागली.

हेही वाचा :

  1. लोकसभा निकालानंतर खदखद बाहेर; पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, विखे-लंके कार्यकर्ते भिडले - Rahul Zaware Car Attack
  2. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का, नीलेश लंकेंचा विजय, विखेंचा पराभव - Ahmednagar Election 2024 Result
  3. ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड? लंकेनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Nilesh Lanke On EVM Machines

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.