पुणे Pune ISIS Module Case : पुणे इसीस दहशतवाद मोड्युल प्रकरणी एनआयए मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पुण्यातील कोंढवा येथील 4 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोथरूड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांचं सातारा कनेक्शन उघड झाल्यानंतर आता हे दहशतवादी ज्या ठिकाणी राहत होते, त्या प्रॉपर्टीज एनआयएनं जप्त केल्या आहेत.
सातारा कनेक्शन उघड : काही दिवसांपुर्वी पुण्यातून पकडलेल्या इसीसच्या दहशतवाद्यांनी साताऱ्यात लूट केल्याचं उघड झालं होतं. साताऱ्यातील एका साडीच्या दुकानदाराला बंदुकीच्या धाकावर या दहशतवाद्यांनी लुटलं. त्याच्याकडून घेतलेल्या एक लाख रुपयातून बॉम्ब बनवण्याचं सामान घेतल्याचंही तपासात पुढं आलं. पुण्यातील कोथरुड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान या तीन दहशतवाद्यांचा यात समावेश होता. दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले आणि ते पैसे नेमके कोणाकोणाला आणि कशा प्रकारे दिले गेले याबाबतचा तपास सुरू होता.
साताऱ्यात लूट करुन बॉम्ब बनवण्याची घेतलं सामान : इसीस दहशतवाद मोड्युल प्रकरणी अटकेतील दहशतवादी साताऱ्यात तळ ठोकून होते. यात साताऱ्यात शाहनवाज आलम आणि मोहम्मद साकी यांनी दुकानात लूटमार केली होती. या दहशतवाद्यांनी लुटीनंतर चोरी केलेली रोकड ही दहशतवादी कृत्यासाठी वापरली होती. 1 लाख रुपये किमतीची बॉम्ब बनवण्याचं सामान या दहशतवाद्यांनी खरेदी केलं होतं. तसंच तयार करण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्या विविध ठिकाणच्या जंगलात आरोपींनी घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं होतं. असं असतानाच आता एनआयएनं अटकेतील दहशतवाद्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केल्या आहेत.
हेही वाचा -
- Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान
- Pune ISIS Module : पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी 'या' हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येचा रचला कट; एटीएसच्या तपासात माहिती आली समोर
- Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती