मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात, मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगानं निरनिराळ्या युक्त्या अमलात आणल्या. यंदा लोकसभेसाठी मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये एकूण ९८ हजार २९६ नव मतदारांचा समावेश झालाय. यामध्ये सर्वाधिक नव मतदार हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असून येथील नव मतदारांची संख्या ही २०,५१९ आहे. आज मतदान पार पडत असताना, मुंबई तसंच मुंबई उपनगरातील अनेक मतदारसंघात नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं.
असे आहेत मुंबईतील नव मतदार : मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात २०,५१९ नव मतदार आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात १६,५२९ नव मतदार आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १६,७६८ नव मतदार आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात १६,८३७ नव मतदार आहेत. मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ११,६२२ नव मतदार आहेत. तर सर्वात कमी नव मतदार मुंबई दक्षिण मध्ये ११,०९७ इतके आहेत.
नव मतदारांमध्ये उत्साह : आज मतदानाच्या दिवशी नव मतदारांचा उत्साह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान संथ गतीनं सुरू होते. याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी राग व्यक्त केला. परंतु नवमतदारांची मतदानाची ही पहिलीच संधी असल्याकारणानं ते सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव घेत होते. त्याचबरोबर मतदान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी नव मतदार शेवटपर्यंत रांगेत उभे राहिले होते.
हेही वाचा -
- मतदान सुरळीत होण्यासाठी मतदारांना मदत करा, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाच्या नियोजनावर व्यक्त केली नाराजी - Lok Sabha Election 2024
- उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या 'पंजा'ला केलं मतदान; म्हणाले... - Lok sabha election
- गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर; नेमकं काय घडलं? - Lok Sabha Election 2024