ETV Bharat / state

दक्षिण कोरिया जॉब रॅकेट प्रकरणात टेरर अँगलची शक्यता, नौदलातील अधिकारी शर्मा आणि आरोपी डागरा जम्मू काश्मीरमधील शाळेतले वर्गमित्र - South Korea job racket

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 10:27 PM IST

South Korea job racket सध्या दक्षिण कोरियातील जॉब रॅकेट चांगलेच तापत आहे. त्यामध्ये आता दहशतवादी कारवाईचा माग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नौदलातील अधिकारी आणि आरोपी दोघे काश्मीरातील वर्गमित्र असल्याचं निदर्शनास आलं आहे. वाचा काय आहे एकूणच प्रकरण...

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र (File photo)

मुंबई South Korea job racket: दक्षिण कोरियामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे तरुणांना पाठवणाच्या मोठ्या रॅकेटमध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या सीआरयुने मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. खास करून जम्मू काश्मीर मधल्या सचेतगड या गावातील अकुशल कामगारांना छोट्या-मोठ्या कामासाठी दक्षिण कोरियात बनावट कागदपत्रांच्या आधारे पाठवणाऱ्या या रॅकेटमध्ये नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं निष्पन्न झाल्यानं खळबळ उडाली आहे. नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागरला (वय २८) सीआययूने शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर सब लेफ़्टनंन्ट ब्रह्मज्योती शर्मा आणि ब्रह्मज्योती शर्माची जवळची मैत्रीण सिमरन तेजी यांना पुण्याहून अटक करण्यात आली आहे. दरम्यान सी आय यु ने जम्मू काश्मीर मधून दक्षिण कोरियात निघालेल्या रवी कुमार आणि तरुणांना दक्षिण कोरियात पाठवणाऱ्या दीपक डागरा यांना अटक करण्यात आली होती. दीपक डागरा आणि सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा हे दोघेही जम्मू काश्मीर मधील शाळेत शिकले असून ते शाळेपासूनचे मित्र आहेत. त्याचप्रमाणे दीपक डागरा हा तीन ते पाच वर्ष दक्षिण कोरियात राहिला असून त्याने काही काळ खाटीक म्हणून काम केले आणि नंतर ब्युटी मास्क बनवण्याचे देखील काम केले असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या कामातून दीपक डागरा याने 25 ते 30 लाख कमावले होते. जवळपास 1000 पेक्षा जास्त जम्मू-काश्मीरमधील तरुण दक्षिण कोरियात काम करत असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

29 वर्षीय सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा हा आरोपी डेटिंग ॲपच्या माध्यमातून सिमरन तेजी या तरुणीच्या संपर्कात आला आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोघेही अतिशय जवळचे मित्र आहेत. सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा हा लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे काम करत असताना पुण्यात राहणाऱ्या सिमरन तेजी हिच्याशी डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. सिमरन ही पुण्यात एका कॉलेजमध्ये जर्मन भाषा शिकवत असल्याची माहिती देखील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. सिमरनने तिच्या आई आणि आजीच्या नावावर सुद्धा बँक खाती उघडली आणि ती शर्मा याच्या मोबाईल क्रमांकाला जोडलेली होती. सिमरन हिच्या बँक खात्यात 43 लाख रुपये जमा होते. तसंच नौदलाचा लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागर आणि सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा यांच्या बँक खात्यात देखील जवळपास 40 लाखांच्या आसपास रक्कम असल्याची माहिती मिळत आहे.

डागर हा आरोपी वेस्टर्न नेवल कमांडमध्ये इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होता. त्याची पोस्टिंग कुलाबा येथे करण्यात आली होती. मात्र, त्याआधी डागर हा विशाखापट्टणम येथे काम करत असताना चेन्नई येथील साऊथ कोरियाच्या ॲम्बसीमध्ये जाऊन दक्षिण कोरियात तरुणांना पाठवण्यासाठी आपल्या पदाचा वापर करत असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मुंबईत पोस्टिंग झाल्याने मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या दक्षिण कोरियाच्या ॲम्बेसीच्या कार्यालयात जाऊन जम्मू काश्मीर येथील रविकुमार या नववी पास असलेल्या तरुणाला बोगस डॉक्टर म्हणून सांगून त्याचा विजा जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करत होता. विपिन कुमार नाशिक येथे दाताचा दवाखाना रविकुमार चालवत असल्याचे बोगस कागदपत्र देखील त्याने तयार केले होते. मात्र साउथ कोरियाच्या अँबेसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना जम्मू काश्मीर मधील व्यक्ती दिल्लीतील कार्यालयात न जाता मुंबईत कशी काय आली याबाबत संशय आला. त्यावरूनच या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर दक्षिण कोरियाला जाणाऱ्या रविकुमारला अटक करण्यात आले. रवी कुमार दक्षिण कोरियात कार्पेंटरचे काम करणार होता.

महत्त्वाचे म्हणजे 2017 मध्ये आरोपी दीपक डागरा हा दक्षिण कोरियामध्ये नोकरी निमित्त गेला होता. तीन वर्ष डागरा तेथे राहिल्यानंतर कोविड दरम्यान तो पुन्हा भारतात आला. तीन वर्षात डागरा याने 25 ते 30 लाख रुपये कमावले होते. डागरा याची जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन असून जम्मू काश्मीर मधील तरुणांना दक्षिण कोरियात पाठवण्यामागे डागराचाच मोठा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोरियामध्ये राहण्याचा, खाण्याचा कमी खर्च असल्याने आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी झटपट मिळत असल्याने बांगलादेश आणि पाकिस्तानचे अनेक नागरिक तेथे नोकरीसाठी जात असतात. दक्षिण कोरियातील सुंदरी या गावात अनेक भारतीय राहत असून पाकिस्तानी नागरिक देखील दक्षिण कोरिया मोठ्या संख्येने असल्याने टेरर अँगल तपासण्याची आवश्यकता असल्याची माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.