ETV Bharat / state

सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी, अन्यथा जशास तसे उत्तर दिलं जाणार - सुनिल तटकरे - Supriya Sule

Sunil Tatkare On Supriya Sule : एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावरून आता प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी टीकेची भाषा सुधारावी. अन्यथा जसेच्या तसे उत्तर दिलं जाईल, अशी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Sunil Tatkare On Supriya Sule
Sunil Tatkare On Supriya Sule
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 11:03 PM IST

सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई Sunil Tatkare On Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पतीचा हवाला देत, अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. या टीकेला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, "सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जसेच्या तसे उत्तर दिलं जाईल," अशी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

जशाच तसं उत्तर देऊ : "सुनेत्रा पवार या उत्तम वक्त्या आहेत. त्यांचंही तिन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. त्यासोबतच त्यांनी स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामातून ओळख निर्माण केली आहे. सुळे यांनी संसदेत सुनेत्रा पवार यांच्या भवितव्याबाबत निराशेपोटी असं वक्तव्य केलं. मात्र, त्यांनी यापुढं असं वक्तव्य केल्यास त्यांनाही तसंच उत्तर दिलं जाईल," असा इशारा सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे. "सदानंद सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, आहे आणि राहील. पण, महिला खासदारांचे पती पर्स घेऊन संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत फिरताना दिसत नाहीत. त्यामुळं सुनेत्रा पवार यांचं संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे विधान असंस्कृत आहे. ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीला शोभणारे नाही," असा निशाणा त्यांनी सुळेंवर साधला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुळे? : "तुम्हाला माझ्या पतीनं भाषण केलेलं चालेल का? माझे पती संसदेत जाणार की मी जाणार? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. तसंच पतीला संसदेच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. त्यांना कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. तुम्हाला कसा खासदार हवा आहे, असा सवाल त्यांनी बोलताना केला होता. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलंत का :

  1. "जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात...", शरद पवारांनी कोणावर साधला निशाणा?
  2. राज्यसभा निवडणुकीत घोडाबाजार! हिमाचलमध्ये भाजपाचा उमेदवार विजयी; आमदार फोडल्याचा काँग्रेसचा आरोप
  3. "जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात...", शरद पवारांनी कोणावर साधला निशाणा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.