ETV Bharat / state

लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर लागणार वर्णी; अर्ज केला दाखल - Sunetra Pawar - SUNETRA PAWAR

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी जाहीर केली. बारामती लोकसभा मतदार संघात दारुन पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं आता पुन्हा नणंद भावजयांचं राजकारण दिल्लीत रंगणार आहे. आज सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

Sunetra Pawar Nomination For Rajya Sabha
राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 1:22 PM IST

Updated : Jun 13, 2024, 5:42 PM IST

पुणे Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर अजित पवार चांगलेच विचलित झाले. मात्र, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं बारामती लोकसभेत हारल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळं आता नणंद भावजया दिल्लीत खासदार म्हणून काम करणार आहेत.

प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार (ETV BHARAT Reporter)

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल : सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याचा झाला निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्षानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्याचा एकमुखानं निर्णय घेतला. या पदासाठी मी इच्छूक होतो, मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव अंतिम करण्यात आलं. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी याबाबतची भूमिका घेतली. पक्षात अनेकही नेते राज्यसभेसाठी इच्छूक होते. मात्र सुनेत्रा पवार यांना आम्ही सगळ्यांनी मिळून उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीवरुन मी नाराज नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बारामती लोकसभेत दारुन पराभव : बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळं बारामतीच्या राजकारणात काकांचं राजकारण पुतण्यावर भारी पडल्याचं निश्चित झालं. मात्र "बारामती लोकसभा मतदार संघातील पराभव हा अनपेक्षित होता. आम्ही या पराभवाची कारणमिमांसा करु. झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे, मात्र पुढील निवडणूक मोठ्या जोमानं लढवू," असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदार संघात पराभव झाला, तरी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं नणंद भावजया दोघींचाही दिल्लीत खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा :

  1. अजित पवारांना 'दे धक्का'! बारामतीत सुप्रिया सुळेंचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंदबाईंना हरवलं - Baramati Lok Sabha Results 2024
  2. काय सांगता! ज्यांच्याविरुद्ध लढा, त्यांच्याकडूनच घेतलंय 55 लाखांचं कर्ज, सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा - Lok Sabha Election 2024
  3. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ - Sunetra Pawar Emotional

Last Updated : Jun 13, 2024, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.