Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षचिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना समज देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही गटांना 19 मार्च 2024 ला दिलेल्या न्यायालयाच्या मागील अंतरिम आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. तसंच शरद पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरावं, आणि अजित पवार गटानं न्यायालयाच्या निर्देशानुसार घड्याळ चिन्ह वापरावं, असंही न्यायालयानं म्हटलंय. अजित पवार गटानं कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नसल्याचा आरोप करत शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं : आजची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर पार पडली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीनं सुनावणी सुरू होताच अजित पवार गटाकडून छापण्यात आलेल्या काही जाहिराती, पोस्टर्स, आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या. या जाहिरातींनध्ये घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर देण्याचे न्यायालयानं दिलेले निर्देश पाळले गेले नाहीत. तसंच अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टानं 'घड्याळ' चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा दिशाभूल करणारा दावा केला.
यावेळी अजित पवार गटाची बाजू मांडत ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, यापुढं अधिक ठळकपणे संबंधित मजकूर छापला जाईल. तसंच याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन केलं जाईल, अशी हमी देखील त्यांनी दिली. तसंच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पदाधिकारी, उमेदवार, समर्थकांना निर्देश दिले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तर यावेळी खंडपीठ पूर्वीच्या आदेशात बदल करणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, काही नियमांचं पालन करूनही न्यायालय कोणत्याही पक्षाच्या प्रामाणिकपणावर शंका घेत नाही. तळागाळातील अडचण आम्हाला समजते, मात्र तुमच्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
हेही वाचा -
- राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा वाद; जाहिरातीत 'हा' उल्लेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांच्या गटाला फटकारलं - Sharad Pawar Vs Ajit Pawar
- "आपच्या अजून काही नेत्यांना तुरुंगात...", नेमकं काय म्हणाले शरद पवार? वाचा सविस्तर - Sharad Pawar News
- NCP Political Crisis : राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते-शरद पवार