ETV Bharat / state

स्विफ्ट कारमधून अंमली पदार्थांची तस्करी, गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीने रचला सापळा, चौघांना अटक - Drug Smugglers Arrested

Drug Smugglers Arrested : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून अहमदनगर येथून चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 111 किलो गांजा जप्त केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे १११ किलो गांजा या अंमली पदार्थासह चौघांना अटक केली आहे.

Drug Smugglers Arrested
ड्रग्ज तस्करांना अटक (ETV Bharat REporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 9:53 PM IST

मुंबई Drug Smugglers Arrested : एनसीबीकडून अटक करण्यात आलेले चौघे स्विफ्ट या मोटारी कारमधून गांजा हा अंमली पदार्थ घेऊन मुंबईकडे येत असताना एनसीबीच्या पथकाने पाथर्डी येथील दगडवाडी फाटा येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून जप्त करण्यात आलेला १११ किलो गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी किंमत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. नांदेड जिल्ह्यातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) मिळाली होती. एनसीबीने रविवारी पहाटे नांदेड येथून अंमली पदार्थ घेऊन निघालेल्या दोन स्विफ्ट कारचा पाठलाग करून ही कार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या करंजी गावाजवळ असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दगडवाडी फाटा या ठिकाणी कार अडविण्यात आली. एनसीबीने दोन कारमध्ये असणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता कारमध्ये १११ किलो गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.

आरोपींकडून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न : पोलिसांनी कारसह चारही संशयित तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थाची तस्करी सुरू होती. या तस्करीबाबत एनसीबीच्या मुंबई विभागाच्या पथकाला माहिती मिळाली असता पोलीस पथकाने तस्करी करणाऱ्याची माहिती मिळवून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री नांदेड येथून मुंबईकडे गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच एनसीबीचे पथक नांदेड येथे रवाना झाले आणि एनसीबीच्या पथकाने दोन संशयित स्विफ्ट कारचा पाठलाग सुरू केला. आपल्या मागावर पोलीस असल्याची कुणकुण स्विफ्ट कारमधील तस्करांना लागताच त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

चार तरुणांना घेतले ताब्यात : एनसीबीच्या पथकाने पाथर्डी येथील दगडवाडी फाटा येथे दोन स्विफ्ट कारला थांबवून १११ किलो गांजा या अंमली पदार्थासह चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले. या तरुणांकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे २ कोटी रुपये असल्याचे एनसीबीचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी सांगितले. मुंबईत गांजाची तस्करी कुठे करण्यात येणार होती. याबाबत या तरुणांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबी पथकाने दिली आहे.

या चौघांना केली अटक : एका गुप्त माहितीच्या आधारे, एनसीबीने ओडिशातून गांजा आणणाऱ्या टोळीवर नजर ठेवली होती. टोळीतील सदस्य सतत त्यांचे लोकेशन आणि मोबाईल नंबर बदलत होते. त्यांच्या कार्यशैलीवर बारीक लक्ष ठेवून एनसीबीने काल पाथर्डी, अहमदनगर येथून दोन चारचाकी वाहनांतून आणला जात असलेला 111 किलो गांजा पकडला. एनसीबीने एसएम मोरे, एल शेख, आर मोहिते आणि एस शेख या चार आरोपींना अटक केली आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ओडिसा येथून गांजा आणून तो पुणे आणि मुंबईत विकला जाणार होता. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे.

हेही वाचा :

  1. "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News
  2. मुंबईकरांच्या बोकांडी बसणार पाणीपट्टीची वाढ? वॉटर टॅक्समध्ये 8 टक्के वाढीचा प्रस्ताव - BMC Water Tax Increase Proposal
  3. विदर्भात कुठेही कत्तलखाना होऊ देणार नाही, वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - Nagpur Kattalkhana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.