ETV Bharat / state

सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण - Naxal Woman Surrender In Gadchiroli - NAXAL WOMAN SURRENDER IN GADCHIROLI

Naxalite Woman Surrender In Gadchiroli : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशामध्ये नक्षलवादी कारवाया करणारी जहाल महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी हिनं आत्मसमर्पण केलं आहे. संगीता पुसू हिच्यावर राज्य सरकारनं तब्बल 6 लाखांचं बक्षीस घोषित केलं होतं.

Naxalite Woman Surrender In Gadchiroli
जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 1:40 PM IST

Updated : Aug 22, 2024, 2:38 PM IST

सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण (Reporter)

गडचिरोली Naxalite Woman Surrender In Gadchiroli : एका सरपंचासह दोन निरपराध व्यक्तींचा खून, सात चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप असलेल्या जहाल नक्षलवादी महिलेनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. संगीता पुसू पोदाडी असं पोलिसांपुढं आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं नाव आहे. संगीता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता (40 वर्ष), भामरागडमधील तुर्रेमरका, इथली राहणारी आहे. संगीता पुसू ही वयाच्या 16 व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होऊन तिनं शस्त्र उचललं. अनेक जहाल कारवाया केल्यामुळे महाराष्ट्र शासनानं तिच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

संगीता पोदाडीनं 7 चकमकीत घेतला सहभाग : संगीता पोदाडी ही 2007 मध्ये छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील नैबरेड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. संगीताची 2008 मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजनमध्ये बदली झाली. पुढं तिनं महासमुंद दलममध्ये काम केलं. 2014 मध्ये तिला सहायक कमांडर म्हणून बढती मिळाली. या कार्यकाळात संगीताचा छत्तीसगडमधील पाच आणि ओडिशातील दोन अशा एकूण सात चकमकीत सहभाग होता. छत्तीसगडच्या सोनपूर इथल्या रस्ता कामावरील ट्रॅक्टर आणि जेसीबी जाळल्याचा गुन्हाही तिनं केला.

सन्मानानं जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण : संगीता पोदाडी हिनं सन्मानानं जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण केलं आहे. सन्मानानं जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत 24 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचं आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 37 बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. मात्र जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील, त्यांना लोकशाही मार्गानं सन्मानाचं जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, असं आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. Naxalite Surrender Gadchiroli : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलवादीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
  2. Naxalite Surrender Gadchiroli : 20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
  3. सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल महिलेचे आत्मसमर्पण

Last Updated : Aug 22, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.