ETV Bharat / state

बोगस कागदपत्रांआड गरजू युवकांना दक्षिण कोरियात नोकरीसाठी पाठवायचा; 'या' कारणानं सत्य आलं उजेडात - South Korea Job Scam - SOUTH KOREA JOB SCAM

South Korea Job Scam: बनावट कागदपत्रांच्या आधारे युवकांचा व्हिसा बनवून त्यांना दक्षिण कोरियात पाठवणाऱ्या नौदलातील लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागर याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुलाबा येथून अटक केली. युवकांचा व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यानं आरोपी अधिकाऱ्यानं वरळी येथील दक्षिण कोरिया कौन्सिलेटमध्येच गोंधळ घातला. त्यानंतर त्याचं काळं काम समोर आलं.

South Korea Job Scam
फाईल फोटो (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 5:05 PM IST

मुंबई South Korea Job Scam : नौदलात काम करणारा लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागर हा सध्या कुलाबा येथे पोस्टिंगवर होता. कुलाबा येथून नौदलाच्या गणवेशातच बोगस कागदपत्रांच्या आधारे दक्षिण कोरियात जाण्याकरता रविकुमार याचा व्हिजा मिळावा म्हणून वरळीतील दक्षिण कोरियाच्या कौन्सिलेट कार्यालयात गेल्या आठवड्यात गेला होता. त्यावेळी त्यानं जम्मू काश्मीरमधील रवी कुमार याचा व्हिजा मिळावा म्हणून गोंधळ घातला आणि तेथेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचे काळे धंदे उघड झाले.

व्हिसासाठी गोंधळ घातला अन् झाली अटक : विपिन कुमार डागर हा व्हिसा प्रक्रिया जलद करण्यासाठी दूतावासातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी नौदल अधिकारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करायचा. दक्षिण कोरियाला पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या व्यक्तीचा व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यास तो काही दिवस अगोदर दूतावासात जाऊन चौकशी करायचा. अशाच एका भेटीदरम्यान त्यानं व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यानं वरळी येथील दक्षिण कोरिया कौन्सिलेटमध्येच गोंधळ घातला. त्यानंतर त्याचे बिंग फुटले आणि शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विपीनकुमार डागर याला कुलाबा येथून अटक केली.

'या' कारणानं कागदपत्रांवर आला संशय : विपिन कुमार डागर यानं बोगस कागदपत्रे बनवून रवी कुमार या नववी पास असलेल्या तरुणाला दाताचा डॉक्टर असल्याचं दाखवलं होतं. त्याचप्रमाणे त्याचा नाशिक येथे दवाखाना असल्यानं त्यानं मुंबईतील कौन्सलेट कार्यालयात व्हिजासाठी अर्ज केला असल्याचं सांगितलं; मात्र कौन्सिलेट कार्यालयातील अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीर मधला तरुण असल्यानं त्याचा दवाखाना नाशिकमध्ये कसा, असा संशय आला. त्यावर रवी कुमार याच्या कागदपत्रांवर संशय घेत त्याचा व्हिजा मिळण्यास अडचण निर्माण झाली होती.

शाळकरी मित्राची घेतली मदत : डागर मूळचा हरियाणातील सोनीपतचा असून तो सहा वर्षांपूर्वी नौदलात दाखल झाला. तो गेल्या वर्षभरापासून वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये तैनात होता. डागरचे वडील हवाई दलात कार्यरत होते. डागरची ओळख आरोपी सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा याच्याशी झाली होती. ब्रह्मज्योती शर्मा आणि आरोपी दीपक डोगरा यांनी जम्मू काश्मीर मधील शाळेत एकत्र शिक्षण घेतलं आहे. आरोपी दीपक डोगरा हा दक्षिण कोरियात काम करून आला असल्यानं त्याला तेथील कामकाजाबद्दल आणि इतर सर्व गोष्टींबाबत ज्ञान होतं. कोरोनादरम्यान दीपक डोगरा हा दक्षिण कोरियातून जम्मू-काश्मीरमध्ये परत आल्यानंतर त्यानं जम्मू-काश्मीर मधील सचेतगड येथील तरुणांना हेरून अकुशल कामासाठी दक्षिण कोरियात पाठवण्याचा कट रचला. या कटात त्याने त्याचा शालेय मित्र सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती याचा वापर केला. तर ब्रह्मज्योती यानं बनावट कागदपत्रे बनवण्याकरिता तसेच चेन्नई आणि मुंबईतील दक्षिण कोरिया कौन्सिलेट कार्यालयात जाऊन व्हिजा प्रक्रिया जलद गतीनं करून घेण्याचं काम लेफ्टनंट कमांडर विपिन कुमारवर सोपवलं.

'या' शहरातून तरुण दक्षिण कोरियात पाठवले : आरोपी विपीनकुमार हा विशाखापट्टणम येथे काम करत असताना चेन्नई येथील दक्षिण कोरियाच्या कौन्सिलेट ऑफिसमध्ये जाऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई, चेन्नई आणि जम्मू काश्मीर मधील तरुणांचे व्हिजा काढण्याचे काम करत असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. विशाखापट्टनम नंतर विपिनकुमार याची मुंबईत बदली झाली होती. दक्षिण कोरिया कौन्सिलेटची भारतात दिल्ली, चेन्नई आणि मुंबई कार्यालय आहेत; मात्र दिल्लीतील कौन्सिलेट कार्यालयाला दक्षिण कोरियातून या काळ्या धंद्याबाबत माहिती देण्यात आली होती. कारण याआधी देखील पंजाब, हरियाणा, दिल्ली येथून अशाच प्रकारे तरुणांना दक्षिण कोरियात पाठवलं गेलं असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.

6 जणांना पाठविले दक्षिण कोरियात : नौदलाच्या या दोन अधिकाऱ्यांनी दिल्ली कौन्सिलेट येथे न जाता केवळ मुंबई आणि चेन्नई येथील दक्षिण कोरिया कौन्सिलेटच्या कार्यालयात जाऊन आतापर्यंत एकूण सहा जणांना दक्षिण कोरियात पाठवलं आहे. तर दहा ते बारा जणांचा व्हिजा रिजेक्ट करण्यात आला. दोन जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिजा मिळवून दक्षिण कोरिया विमानतळ गाठलं; मात्र त्यांना विमानतळावरून परत भारतात पाठविण्यात आलं.

हेही वाचा:

  1. नीट-पीजी परीक्षेतही हेराफेरी? 15 हजार विद्यार्थी संशयास्पद; आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर - NEET Paper Leak Case
  2. 10 वर्ष झाली अजून 20 बाकी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधी पक्षनेत्यांचा 'वॉकआऊट' - PM Modi Slams Opposition
  3. नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला- अभिनेता थलपतीनं केंद्र सरकारला 'ही' केली विनंती - ACTOR VIJAY on NEET

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.