ETV Bharat / state

नवी मुंबईत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग; 48 वर्षीय नराधमाला अटक - Minor Girls Molestation - MINOR GIRLS MOLESTATION

Minor Girls Molestation : नवी मुंबईतील दिघा परिसरात एका नराधमानं दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

अल्पवयीन मुलींचा विनयभंग
Minor Girls Molestation (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:49 PM IST

Updated : Aug 22, 2024, 6:38 AM IST

नवी मुंबई Minor Girls Molestation : बदलापूर येथील 4 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच नवी मुंबईतील दिघा परिसरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिघा परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8च्या सुमारास घडली.

नेमकं प्रकरण काय? : 10 आणि 11 वर्षांच्या मुली दिघा परिसरातील स्टेशनरी दुकानात प्रोजेक्ट बनवण्यासाठी कार्डबोर्ड पेपर खरेदी करण्यासाठी जात होत्या. यावेळी आरोपी संजय गायकवाड (वय 48 वर्ष) यानं रात्री 8 वाजता दोन्ही मुलींना थांबवून अश्लीलरीत्या स्पर्श करून त्यांना लाजवेल, असं वर्तन केलं. आरोपी संजय गायकवाडच्या वर्तनामुळे दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. मुलींच्या आई-वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपीला अटक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी संजय गायकवाड याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मुलांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉस्को) कायद्याच्या कलम 74 नुसार आणि कलम 8 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दिघा येथून आरोपी संजय गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.

  • काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनं संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असतानाच बदलापूर शहरातही एका नामांकित शाळेतील 2 चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील सफाई कामगारानं लैंगिक अत्याचार केला. गेल्या दोन दिवसांत महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा

  1. वामन म्हात्रेंना 'ते' वक्तव्य भोवलं; ॲट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल - Vaman Mhatre
  2. बदलापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा; राहुल गांधींनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप - Badlapur School Girl Incident
  3. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक नाही? - minor girl abuse cases
  4. "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका...", बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्ट मत - Badlapur School Case

Last Updated : Aug 22, 2024, 6:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.