ETV Bharat / state

पर्यावरण प्रेमींना मारहाण; विलास शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, पर्यावरण प्रेमींनी घेतली आदित्य ठाकरे यांच्याकडं धाव - Nashik Tree Issue - NASHIK TREE ISSUE

Nashik Tree Issue : नाशिकच्या गंगापूर रोडवरील अडथळा ठरणाऱ्या वटवृक्षांच्या संदर्भात महानगरपालिकेकडून सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी वृक्ष हटविण्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला. याप्रकरणी विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nashik Tree Issue
पर्यावरण प्रेमींना मारहाण (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 10:58 PM IST

नाशिक Nashik Tree Issue : नाशिकच्या गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे वटवृक्ष महानगरपालिका हटवणार आहे. याबाबत जाहीर नोटीस मनपाने दिली आहे. नोटीसीद्वारे हरकत आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या दरम्यान स्थानिक नागरिक, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक तथा उद्धव सेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण प्रेमींना धक्काबुकी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाशिकच्या गंगापूर रोडवर पर्यावरण प्रेमींना मारहाण (ETV BHARAT Reporter)

चर्चेचे रूपांतर वाद विवादात झाले : नाशिकच्या गंगापूर रोडवरील नवशा गणपती चौकातील रोडवर अडथळा ठरणारे, वटवृक्षाबाब महानगरपालिकाकडून सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. अचानकपणे चर्चेचे रूपांतर वाद-विवादात आणि हाणामारीमध्ये झाले. यावेळी माजी नगरसेवक शिंदे यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी पर्यावरण प्रेमी जगबीर सिंग, मनोज साठे, आनंद रॉय, विशाल देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या हल्ल्याने पळापळ होऊन गंगापूर रोडवर गोंधळ निर्माण झाला होता. यामुळं पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत हा वाद मिटवला. यानंतर पर्यावरण प्रेमींच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्यावर चुकीचा आरोप : गंगापूर रोड परिसरातील केवळ रस्त्यातील झाडे तोडण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव होता. त्यावर सुनावणी असताना स्थानिक नागरिक जमले होते. झाडांमुळं होणारे अपघाताची माहिती असल्यानं ते सांगत असताना कथित वृक्ष प्रेमींनी विरोध केला. इतकेच नव्हं तर झाडांमुळं मृत्यू होत नाही तर दारू पिऊन मृत्यू झाले असे कथित वृक्षप्रेमींनी सांगितल्यानं नागरिक संतप्त झाले आणि तिथून वादाला सुरुवात झाली. मी सुरुवातीला वाद सोडवत असताना व्हिडिओ तयार करून तो आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आला. मी वृक्ष तोड करण्यासाठी आलो अशी चुकीची माहिती दिली. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले. स्थनिक नागरिकांच्या भावना दुखावतील अशी विधाने करण्याची गरज नव्हती असं विलास शिंदे यांनी सांगितलं.

झाडांमुळं अनेक मृत्यू : गंगापूर रोडवर आठ मोठी झाडे रस्त्याच्या मधोमध आहेत. यामुळं वारंवार येथे अपघात होतात. आत्तापर्यंत 30 हुन अधिक जणांचा मृत्यू झाडाला धडकल्यामुळं झाला आहे. तर 100 अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. म्हणून आम्ही महानगरपालिकेला झाड हटवण्यासाठी विनंती केलीय. मात्र, काही कथित वृक्षप्रेमी यास विरोध करत आहे. त्यांना लोकांच्या जिवापेक्षा झाडं महत्त्वाची आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.

पोलीस आयुक्तांची भेट : संतप्त वृक्षप्रेमींनी घडलेल्या प्रकारानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यांना सर्व प्रकार सांगितला, त्यावेळी त्वरित पोलीस उपायुक्त यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. तेथून पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमीचे शिष्टमंडळ उपायुक्त कार्यालयात गेले. पोलीस उपायुक्त चव्हाण यांच्याशी चर्चा करून कारवाईची मागणी केली. त्यांनी सर्व समजून घेत कारवाईचं आश्वासन दिलं.

आदित्य ठाकरे घेणार बैठक : वृक्षतोड करण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला असून त्यामुळं त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं धाव घेतली. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून वृक्षतोडीला पर्याय काय करता येईल या संदर्भात मुंबईत बैठक घेणार आहेत. दरम्यान, पर्यावरण प्रेमींना झालेल्या मारहाण प्रकरणामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा -

  1. ४०० वर्षाच्या प्राचीन वटवृक्षाला अखेर जीवदान...महामार्गात होणार बदल
  2. सांगलीतील वटवृक्ष वाचवण्याचीआदित्य ठाकरेंची नितीन गडकरींकडे मागणी
  3. ४०० वर्षांचा वटवृक्ष वारकऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण, संवर्धनासाठी वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.