नाशिक Nashik Muder News : नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर म्हाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात 25 मार्च रोजी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडलीय. निलेश श्रीपत उपाडे (वय 21) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या (Muder News) करण्यात आलीय. या घटनेबाबत पंचवटी पोलीस (Panchavati Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून धुलीवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे.
कशी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहणार निलेश उपाडे हा सराईत गुन्हेगार होता. 25 मार्च रोजीच्या मध्यरात्री किरकोळ कारणावरून पंचवटी भागातील फुलेनगर म्हाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात निलेश याची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. काही तासातच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत सहा संशयितांना ताब्यात घेतलं. यातील चार अल्पवयीन बालक आहेत. यातील काही संशयित देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
किरकोळ कारणावरून हत्या : तू आमची कुरापत काढतो, अशा किरकोळ कारणावरून आरोपींनी निलेश उपाडे या युवकाची हत्या केली. यात सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत निलेश हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत अशी माहिती, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
माझ्यासमोर माझ्या मुलाची वार करून हत्या केली : घराजवळच माझ्या मुलावर 10 ते 12 जण कोयत्याने हल्ला करत होते. मी ओरडत होते पण मदतीसाठी कोणी येत नव्हतं. अनिल सोनवणे, सागर सोनवणे आणि त्याच्याबरोबर इतर 10 ते 15 जण होते. पहिल्या दिवशी देखील चार ते पाच जणांनी माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत मी पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. हल्ला झाल्यानंतर माझा मुलगा जखमी झाला पण त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी पोलीस आले नाही, त्यांनी आम्हालाच हॉस्पिटलला पाठवून दिलं. माझ्या मुलावर तीनवेळा हल्ला झाला पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी, मृत निलेशच्या आईनं केलीय.
हेही वाचा -