ETV Bharat / state

हिंगोलीत चार वर्षात भूकंपाचे 25 धक्के; भूकंपामुळं नासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हादरे? - NASA Ligo LAB Project - NASA LIGO LAB PROJECT

Hingoli Earthquake : हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथं दुसऱ्यांदा 4.5 रिस्टर स्केल इतका भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. याच ठिकाणी नासा तर्फे प्रयोगशाळा उभारण्याची तयारी असताना या भूकंपामुळं हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Hingoli Earthquake
Hingoli Earthquake (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 1:41 PM IST

Updated : Jul 10, 2024, 3:14 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Hingoli Earthquake : मराठवाड्यात आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यात आढळून आला आहे. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथं दुसऱ्यांदा 4.5 रिस्टर स्केल इतका भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. याच ठिकाणी 'नासा'तर्फे प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. या भूकंपामुळं या प्रकल्प अडचणीत येणार आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आजपर्यंत 25 धक्के याच भागात बसले आहेत. या ठिकाणी भूगर्भाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं मत भूगर्भ आणि हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं.

हिंगोलीत चार वर्षात भूकंपाचे 25 धक्के (Source - ETV Bharat Reporter)

हिंगोली पुन्हा केंद्रबिंदू : मराठवाड्यात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का अनुभवायला मिळाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली असलं तरी त्याची तीव्रता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा याठिकाणी जमिनीच्या खाली 10 किलोमीटर 4.5 इतकी तीव्रता असलेला भूकंप झाला. कधीही भूकंप न झालेल्या हिंगोली जिल्ह्यात 27 फेब्रुवारी 2020 पासून ते आज पर्यंत 25 धक्के बसले आहेत. त्यांची तीव्रता हळूहळू वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कमीत कमी 1.5 रिस्टर स्केल ते जास्तीत जास्त 4.5 रिस्टर स्केल इतकी तीव्रता आजपर्यंत नोंदवली गेली. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे या धक्क्याचे केंद्र असल्याचं दिसून आलं. या आधी 21 मार्च 2024 रोजी याच ठिकाणी 4.5 रिस्टर स्केल या तीव्रतेचा धक्का बसला. पुन्हा याच ठिकाणी तितक्याच तीव्रतेचा धक्का पुन्हा आल्यानं ही चिंतेची बाब असल्याचं मत अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं.

प्रयोगशाळा अडचणीत : गुरूत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी 'नासा'तर्फे लिगो ही प्रयोगशाळा करण्यासाठी 2020 मधे मंजुरी मिळाली होती. गेली अनेक वर्ष या प्रयोगशाळेसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केरण्यात आले. राज्यात अशा प्रकारची प्रयोगशाळा पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यात सुरू करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती. त्यामुळं या भागाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होणार होतं. या प्रयोगशाळेला मान्यता देत असताना त्या भागात भूकंप होऊ नयेत, असे निकष होते. याआधी कधीही हिंगोलीमध्ये असे भूकंपाचे धक्के बसले नव्हते. त्यामुळं तिथं परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या काळात भूकंपाचे 25 धक्के बसल्यानं या ठिकाणी सुरू होणारी प्रयोगशाळा अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याची भीती भूगर्भ आणि हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

  1. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिकांची पळापळ, 'या' जिल्ह्यात आहे मुख्य केंद्र - EARTHQUAKE IN HINGOLI
  2. बापरे बाप...! नागपुरात एकाच घरात निघाले कोब्रा सापाचे तब्बल 14 पिल्लं - Cobra Snakes Found

Last Updated : Jul 10, 2024, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.