ETV Bharat / state

मोदी सरकारच्या माध्यमातून रत्नागिरीचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध - नारायण राणे - Narayan Rane About Ratnagiri - NARAYAN RANE ABOUT RATNAGIRI

Narayan Rane About Ratnagiri : राज्याचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचा विकास करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून मी रत्नागिरीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असेल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे दिली. ते आज (28 एप्रिल) उद्यमनगर येथील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

Narayan Rane About Ratnagiri
नारायण राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 9:15 PM IST

रत्नागिरी Narayan Rane About Ratnagiri : " उदय सामंत यांच्या कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध आहेत. मी एकटा नाही. मला येथे धोका वाटत नाही. उदय म्हणजे माझा विश्वास आहे. मी अविश्वास ठेवून काम करत नाही. त्यामुळे रत्नागिरीतून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार आहे. मित्र असलेला आणि राज्याचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचा विकास करत आहेत. त्याच्या जोडीला मोदी सरकारच्या माध्यमातून रत्नागिरीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी उद्यमनगर, पटवर्धनवाडी येथील लोकमान्य टिळक सभागृहात शहर प्रभाग क्रमांक २, ३, ४ मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार : याप्रसंगी मंत्री राणे म्हणाले की, "कोरोना काळात व्यवसाय, दुकाने, कारखाने बंद पडले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्याकरिता प्रयत्न केले. माझ्या खात्याला साडेपाच लक्ष कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून कारखाने उभे राहिले. कामगारांना रोजगार मिळाला. पंतप्रधान मोदी जे सांगतात ते पूर्ण करतातत. २०४७ मध्ये शतक महोत्सव साजरा करताना भारत विकसित राष्ट्र होणार आहे.

रत्नागिरीत विकासकामे सुरूच : मंत्री उदय सामंत म्हणाले की, "रत्नागिरीचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि मंत्री नारायण राणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत विकासकामे सुरूच आहे. शहरालगतच्या उद्यमनगर येथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मिळत आहे. त्यातून विकासकामे सुरू आहेत. येणाऱ्या निवडणुकीत नारायण राणे यांना विजयी करायचे आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळेल. त्यांच्याकडून हक्काने रत्नागिरीच्या विकासाची कामे करून घ्यायची आहेत. यावेळी दोन तीन चार प्रभागातील नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'या' नेत्यांची उपस्थिती : याप्रसंगी मंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, माजी नगराध्यक्ष राजेश्वरी शेट्ये, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रवीण देसाई, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, कौशल्या शेट्ये, पल्लवी पाटील, नितीन गांगण प्रसाद शेट्ये, प्रसाद बाष्टे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे या लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. ही जागा भाजपाच्या वाट्याला आल्यानंतर मंत्री उदय सामंत हे नारायण राणेंच्या प्रचारासाठी सहभागी होताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जात आहे? अमोल कोल्हेंचा सवाल - Shirur Lok Sabha election
  2. "पंतप्रधान मोदी अब्जाधीशांसाठी काम करतात, तर पटनायक...", राहुल गांधींचा हल्लाबोल - Rahul Gandhi
  3. पंतप्रधान मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारल्यानं महाराष्ट्रावर...संजय राऊत यांची बोचरी टीका - Lok Sabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.