नंदुरबार flood in the Borvan river: हवामान विभागानं काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा इशारा खरा ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. तर तळोदा तालुक्यातील बोरवण गावातील नदीला पूर आल्यानं गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून पुलाचे काम मंजूर झाले. परंतु कामाला सुरुवात झाली नाही.
गावाचा संपर्क तुटल्यानं विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्धांना जीवघेणा प्रवास: गेल्या काही दिवसांपासून वरुणराजानं पाठ फिरवली होती. मात्र, शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. तळोदा तालुक्यातील बोरवाण गावातील नदीला पूल नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्याय रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहेत. या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीवदेखील गमावा लागू शकतो.
पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक: गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आलेला आहे. पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटूनदेखील प्रत्यक्षात पुल बांधणीला सुरुवात झाली नाही. पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहेत. जर बोरवणीचा नदीला मोठा पूर आला तर त्या परिसरातील दहा गावांचा संपर्क हा तुटत असतो. त्या ठिकाणी आरोग्याच्यादेखील समस्या समोर येत असतात. अनेक महिने उलटूनदेखील पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. गावाची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे.
हेही वाचा
- राज्यात मान्सूनचा धुमाकूळ; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Maharashtra Rain News
- पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; फेसयुक्त पाण्यानं अवघं नदीपात्र झाकलं, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात - Indrayani River Polluted
- 'एनसीसी' कॅम्प बेतला जीवावर; रिझवी कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Four NCC Students Drowned