ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls - TENSIONS IN MVA OVER MLC POLLS

Tensions in MVA Over MLC polls : आगामी विधान परिषद निवडणूक 2024 मध्ये उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता दोन उमेदवार जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली. याबाबत नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Tensions in MVA Over MLC polls
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 12:54 PM IST

मुंबई Tensions in MVA Over MLC polls : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या चार जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपावर महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला. तशाच प्रकारचा तिढा महाविकास आघाडीत पुन्हा विदान परिषद निवडणूक 2024 मध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना विचारात न घेता उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केली. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते. याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विधान परिषद निवडणूक 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

बसून चर्चा केल्यानंतर तोडगा निघेल : या संदर्भात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई, नाशिक शिक्षक मतदार संघासाठी निवडणुका होत आहेत. त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो, की महाविकास आघाडीतील आम्ही सर्व एकत्र बसून सदर मतदार संघातील उमेदवार जाहीर करावे. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या दोन जागा जाहीर केल्या. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते परदेशात होते. त्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं की कोकण आणि नाशिकमध्ये आमचे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांची नावं देखील त्यांना सांगितलं. रमेश किर आणि गुळवेची नावं त्यांना सांगितली. मात्र त्यांनी गुळवे यांना बोलून त्यांचं 'कंगन' बांधून त्यांना पक्षाचं तिकीट जाहीर केलं. खरंतर यामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की, याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला असता, तर विधान परिषदेत चारही जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतील. अजून देखील काही वेळ गेलेल्या नाही, आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. मुंबईमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाकडून कोणताही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. काही लोकांनी अपक्ष भरलेला आहे, मात्र आम्ही पक्षाकडून त्याला अधिकृत तिकीट दिलेलं नाही. वेळ आली तर ते आपला अर्ज माघारी घेऊ शकतात. निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जावं, त्याबाबत बसून निर्णय घ्यावा. मला विश्वास आहे की जागा वाटपासंदर्भात जो वाद निर्माण झाला आहे, तो बसल्यानंतर त्यावर तोडगा निघेल," असा विश्वास असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीवर फोन करुनही उद्धव ठाकरेंशी झाला नाही संपर्क : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उबाठा गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. नाना पटोले यांनी सांगितल्यानुसार नाशिक आणि कोकण मतदारसंघातील उमेदवारी मागं घेण्याच्या भूमिकेत उद्धव ठाकरे नसल्याचं दिसत आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, "बघू आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे, आज दुपारपर्यंत वेळ आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही," असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. "सकाळी मातोश्रीवर फोन लावला, मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही," असंही त्यांनी सांगितलं.

नवनिर्वाचित काँग्रेस खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला : नवनिर्वाचित काँग्रेस खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जातात, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क होतो. मात्र आपला संपर्क होत नाही, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलो आहोत. त्यांना भेटायला जातात, त्यांचे आभार मानून येतात ही काँग्रेसची परंपरा आहे. ज्यांनी सहकार्य केलं त्यांना भेटायला जाणं यात गैर काय," असा सवाल त्यांनी केला. दोन्ही विषय वेगळे असल्याचं त्यांनी म्हटलं. सांगलीच्या जागेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील परिस्थिती पाहायला मिळेल का, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "मला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज करायचं नाही, माझी भूमिका कायम जोडून घ्यायची आहे. महाविकास आघाडीला तडा जाईल, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची नाही."

मोहन भागवत यांनी भाजपाला सल्ला द्यायचं कारण नाही : "भाजपा आणि संघ दोघंही एकत्रित होते. भाजपाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, आम्हाला संघाची गरज नाही, तर मग हे कशाला सल्ला देतात, हे नवलच आहे," असं नाना पटोले यांनी सांगितलं. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर नीट परीक्षा सुरू झाली, नीट परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात बारावीच्या गुणांच्या मेरिट प्रमाणे मेडिकलला प्रवेश देत होतो. नीट परीक्षेचा कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारनं आपल्या ताब्यात घेतलं. जुन्या पद्धतीत मेडिकलमध्ये प्रवेश होऊन आणि नीट परीक्षा रद्द करावी, अशी मागणी आमची आहे. शेअर मार्केटच्या माध्यमातून 800 कोटीचा फायदा चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाला झाल्याचा आरोपी त्यांनी केला आहे.

पक्षाची ताकदच कार्यकर्ता हा असतो : "राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले आहेत. त्याचं रूपांतर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, ही स्वाभाविक भावना आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. मुख्यमंत्री पदासाठी विधानसभेत लागणारं संख्याबळ महत्त्वाचं असतं आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा निर्णय हाय कमांड घेत असतं. त्यामुळे आमच्या पक्षाचे आमदार जास्तीत जास्त निवडून आले तर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील."

हेही वाचा :

  1. राष्ट्रपती राजवटीची काँग्रेसकडून राज्यपालांकडे मागणी, राज्यातील 'या' मुद्द्यांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित - NANA PATOLE News
  2. कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party
  3. काँग्रेस हाय कमांडकडं काही पक्षांचे प्रस्ताव आलेत; नाना पटोलेंचं शरद पवारां प्रत्युत्तर - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.