मुंबई Prataprao Bhosale Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धपकाळान आपल्या राहत्या घरी निधन झालं. प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास भुईंज गावचे सरपंच ते चारवेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त समजतात काँग्रेस पक्षाकडून हळवळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रतापराव भोसले यांनी आयुष्यभर काँग्रेस विचार सोडला नाही. पक्ष कठीण काळातून जात असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार रुजवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनानं एक सुसंस्कृत निष्ठावान नेता हरपला असल्याची भावना नाना पटोले (Nana Patole) यांनी शोक संदेशातून व्यक्त केलीय.
सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठं योगदान : सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला त्याच्या कामाची सुरुवात झाली. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार नंतर कॅबिनेट मंत्री पदाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले. या काळात त्यांनी अनेक महत्वाच्या समित्यांवर काम केलं होतं. १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्याकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून राज्यात सत्ता आणली. प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. संधीचं सोनं करत त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केलं होतं. सातारा जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. त्यांच्या निधनामुळं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीय. प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.
विजय वडेट्टीवार यांचं ट्विट : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्विट करत प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून प्रत्येक जबाबदारीला योग्य न्याय दिला. प्रतापराव भोसले यांचे आज वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पक्ष संघटनेसाठी काम करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांनी प्रत्येक जबाबदारीला न्याय दिला. १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. राजकारण, समाजकारण, शेती सहकार ,कृषी क्षेत्रात योगदान देणारे काँग्रेस विचारांचे निष्ठावंत प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलं.
हेही वाचा -
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news
- "मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्याची कुणाचीही हिंमत नाही, निवडणुकीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीचं..."- योगी आदित्यनाथ - Lok Sabha Election 2024
- उमेदवारांची शेवटच्या दिवशी प्रचारघाई... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं योग्य मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024