ETV Bharat / state

विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत; शाळेसह महाविद्यालयांना सुट्टी - Nagpur Rain Update

Heavy Rain In Vidarbha : नागपूरसह विदर्भात सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली.

Nagpur Rain Update
मुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये जनजीवन विस्कळीत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 3:27 PM IST

Updated : Jul 20, 2024, 7:05 PM IST

नागपूर Heavy Rain In Vidarbha : नागपूरसह संपूर्ण विदर्भात मध्यरात्रीपासूनचं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपराजधानीतील सकल भागात पाणी साचायला सुरुवात झालीय तर अनेक वस्त्यांमध्ये देखील पाणी साचलं आहे. केवळ नागपूरचं नाही तर चंद्रपूर,वर्धा,भंडारा आणि गडचिरोलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू असल्यानं नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नागपूरसह वर्धा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळपासून ९१ मिलिमीटर पावसाची नोंद : गेल्या काही तासात पावसाचं अक्षरशः रौद्ररूप अनुभवायला मिळालेलं आहे. नागपूर हवामान विभागाच्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत नागपुरात तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.

पूर परिस्थिती कुठे उद्भवली आहे का : शहरात आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही सकल भागात पाणी साचल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. काही भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामध्ये वर्धमान नगर, शांती नगर, पारडी, भरतवाडा, शिवशंभूनगर, मनीषनगर, नरेंद्रनगर, सूर्यानगर आणि एच. बी. टाऊन आदी भागांचा समावेश आहे.

भांडेवाडीचा कचरा नागरिकांच्या घरात : भांडेवाडी कचरा डेपो (डंपिंग) जवळ पावसाच्या पाण्यासह डंपिंग यार्डचा कचरा वाहून बाहेर आला आहे. त्यामुळे डंपिंग यार्ड जवळच्या सूरजनगर वस्तीत अनेकांच्या घरी कचऱ्यासह घाणेरडं पाणी शिरलं. परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.

नालेसफाईचा दावा फोल : विशेष म्हणजे महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावा केला होता. भांडेवाडी कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापनाची अद्यावत यंत्रणा असल्याचा महापालिकेचा नेहमीच दावा असतो. मात्र, तीन तासाच्या मुसळधार पावसानं नागपूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची पुन्हा पोलखोल केली आहे. तसंच भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन किती निकृष्ट दर्जाचा आहे त्याचं हं दुर्दैवी उदाहरणच म्हणावं लागेल.

गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप : गोंदिया जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतो आहे. बऱ्याच दिवसापासून जोरदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे अनेक भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात पडला असून आजचा पाऊस मात्र जिल्ह्यात सर्वत्र पडला असल्यानं शेतकऱ्यांचा नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

भंडारा जिल्ह्यातील अतिवृष्टी : भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसामुळं भंडारा, लाखनी साकोली, लाखांदूर, पवनी, या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूरमध्ये बरसला असून तब्बल 241 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर पवनी 197.8, भंडारा 106, लाखनी 96. 3, साकोली 73 तुमसर 40.2 आणि मोहाडी 55.6 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. त्यामुळं सर्व शाळांसह कॉलेजला आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

गोसिखुर्द धरणाचे दारे उघडले : वैनगंगा नदी क्षेत्रात, गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं गोसे धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले. यापैकी 13 दरवाजे 1 मीटरनं, तर 20 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून यामधून 5022. 07 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळं नदी किनाऱ्याच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदी नाले ओसंडून वाहत असल्यामुळे 19 रस्ते हे सध्या रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहे. भंडारा शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच शहरातील बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं आहे. रस्त्यावर पाणी जमा झाल्यानं नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे.

अमरावतीत सर्वत्र रिमझिम : अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासूनच रिमझिम पाऊस बरसतो आहे. जिल्ह्यातील सर्व 14 तालुके ओलेचिंब झाले असून हा पाऊस शेतीसाठी अतिशय उपयुक्त असल्याचं कृषी तज्ञांचं म्हणणं आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस भरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

चंद्रपूरात नदी नाले तुडुंब : चंद्रपूर जिल्हयात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्या पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत. वर्धा, इराई, उमा नदीवर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुपारी 1 वाजता इराई धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला.

हेही वाचा

  1. मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाचं थैमान; रस्ते जलमय, लोकल सेवाही ठप्प - Mumbai Rain Update
  2. मुंबईत बरसणार मुसळधार पाऊस ; ऑरेंज अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा - Mumbai Rain Updates

Last Updated : Jul 20, 2024, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.