नागपूर Nagpur News : तब्बल २० वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या व्यक्तिची कुटुंबीयांशी अचानक भेट झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल)च्या समाजसेवा विभागानं केलेल्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झालं. साधारणपणे २० वर्षांपूर्वी छत्तीसगढ राज्यातील मुंगेली जिल्ह्याच्या करणकापा गावातील जितेंद्र लच्चीराम ध्रुव नावाचा व्यक्ती स्वतःचं घर आणि कुटुंब सोडून निघून गेले. कुटुंबीयांनी अनेक वर्षे यांचा शोध घेतला. मात्र, कुठंही शोध लागत नसल्यानं कुटुंबीयांनी देखील आशा सोडून दिली होती.
मेडिकलच्या समाजसेवा विभागामुळे झाले शक्य : ९ जुलै रोजी जितेंद्र लच्चीराम ध्रुव यांना मेडिकल रुग्णालयात अनोळखी व्यक्ती म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एक अनोळखी व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती मेडिकल रुग्णालयातील 'समाजसेवा विभागा'ला देण्यात आली. समाजसेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अनोळखी व्यक्तीला विश्वासात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर पत्नी राधिका ही तब्बल २० वर्षानंतर पती जितेंद्रला भेटली आहे.
समाजसेवा विभागानं घेतला शोध : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथं एक अनोळखी रुग्ण उपचारर्थ अस्थीरोग विभागाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आला. यासंदर्भात समाजसेवा विभागास माहिती देण्यात आली. उपचार सुरू झाल्यानंतर समाजसेवा विभागाचे अधिक्षक विक्रम लांजेवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णाला विश्वासात घेऊन त्यांचं निरंतर समुपदेशन करण्यासोबत अनोळखी रुग्णाच्या कुटुंबीयांची संपूर्ण माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.
अनोळखी रुग्णाला मिळाली ओळख : अनोळखी रुग्ण छत्तीसगड राज्यातील असल्यानं भाषेची मोठी अडचण येत होती. तरी सुद्धा रुग्णाचे समुपदेशन सुरू ठेवले असता, रुग्णानं ही प्रतिसाद दिला. त्यादिवशी त्या अनोळखी रुग्णानं कुटुंबीक माहिती दिली. रुग्णाचं नाव जितेंद्र लच्चीराम ध्रुव असं असून छत्तीसगड राज्यातील मुंगेली जिल्ह्यात असलेल्या करणकापा गावातील रहिवासी आहेत, ही माहिती पुढं आली.
कुटुंबाचा शोध झाला सुरू : रुग्णानं दिलेल्या माहितीच्या आधारे कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आणि रुग्णाची माहिती कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी समाजसेवा अधिक्षक विक्रम लांजेवार यांनी तपासकार्य सुरु केलं. पोलीस स्टेशन मुंगेली मार्फत पोलीस ठाणा लालपूर यांच्या मदतीनं रुग्णाच्या नातेवाईकाचा शोध लावला आणि रुग्णांची पत्नी राधिका तसेच इतर नातेवाईकांना नागपूरला बोलावण्यात आलं.
एकमेकांना बघताच पती-पत्नी झाले निशब्ध: जितेंद्र यांचं नाव जिधन लच्चीराम ध्रुव असून ते गेल्या २० वर्षांपासून घरुन निघून गेल्याची माहिती दिली. त्याबाबत काही काळ शोध घेतला. मात्र, पती मिळत नसल्यानं त्यांनी पती पुन्हा भेटण्याची आशा सोडून दिली. परंतु ते रुग्णालयात दाखल होणं हे निमित्तमात्र ठरलं. समाजसेवा विभागानं परिश्रम घेत पती-पत्नीची भेट घडवून आली. नातेवाईक यांना बघताच रुग्णाचे आनंदाश्रू अनावर झालेत. जवळपास २० वर्षापासून कुटुंबापासून दूर असलेले जिधन ध्रुव त्यांची पत्नी राधिका या त्यांना बघताच निशब्ध झाल्या होती. त्यांना मिळालेला सुखद धक्का आणि आनंदानं प्रफुल्लित झालेला चेहरा सर्व काही सांगून जात होता. त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांनी वॉर्डातील सर्व नर्सिंग स्टाफ, अटेंडंट आणि समाजसेवा विभाग यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
हेही वाचा