ETV Bharat / state

खळबळजनक! मनोरुग्णाचा नागपूर रेल्वे स्टेशनवर हल्ला; दोन प्रवासी ठार, दोन गंभीर जखमी - Nagpur crime

नागपूर रेल्वे स्थानकावर अत्यंत खळबजनक घटना घडली आहे. एक मनोरुग्णानं फलाटावरील दोन प्रवाशांना ठार केले. तर दोघांना गंभीर जखमी केले.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Nagpur crime
मनोरुग्णाचा नागपूर रेल्वे स्टेशनवर हल्ला (Source- ETV Bharat)

नागपूर - मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर सातवर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होती. तेव्हा अचानक एका मनोरुग्णानं लाकडी रायफटरनं प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मनोरुग्णानं लाकडी रायफटरनं केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा आरोपी फलाटावर लोकांना मारत सुटला होता.

रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफटरने मनोरुग्णानं हत्या केली आहे. गणेश कुमार डी- ५४ ( दिंडीगुल तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. आरोपीनं निर्घृणपणे हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर पाठलाग करून आरोपीला पकडले.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.