ETV Bharat / state

नागपूर हिवाळी अधिवेशन 2024 : अधिवेशनात गाजलं बीड खून प्रकरण; एआयच्या मदतीनं गुन्हेगार शोधणार : देवेंद्र फडणवीस - NAGPUR ASSEMBLY WINTER SESSION 2024

नागपूरच्या हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये आज बीड सरपंच हत्या प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले. दानवेंनी बीड प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल केला, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.

Nagpur Assembly Winter Session 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2024, 1:06 PM IST

नागपूर : बीड इथल्या सरपंचाच्या खुनाचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. बीड सरपंच खून प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारमधील एका मंत्र्यांच्या जवळील व्यक्तीचं नाव या खून प्रकरणात येत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "बीड सरपंच खून प्रकरणात आतापर्यंत कोणाचाही दबाव आला नाही. आरोपी शोधून काढून कोणीही असला, तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात आपण टेक्निकल आणि एआयचा वापर करुन गुन्हेगारांना शोधून काढणार आहोत. गुन्हेगार कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही," असा पलटवार केला.

अंबादास दानवे यांचे सरकारवर गंभीर आरोप : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आज विधानपरिषदेत पडसाद उमटले. विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केले. बीडमध्ये पोलिसांनी आरोपींबरोबर पार्टी केल्याचा आरोप दानवे यांनी केला. "पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. आरोपींमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारीच आरोपी आहे. आरोपींनी पोलीस स्टेशनबाहेर 'बाप तो बाप रहेगा,' असे फलक लावले होते. आरोपींवर तातडीनं कारवाई करा," अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

एआयच्या माध्यमातून करणार तपास, कोणालाही सोडणार नाही : आरोपींना कुणी फोन केले हे तपासावे, अशीदेखील अंबादास दानवे यांनी मागणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंवर मोठा पलटवार केला. "पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा पक्ष, जात, भाषा आणि कोणाशी संबंध, हे पाहणार नाही. हत्या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आरोपींना शोधून अटक केली जाणार आहे. या प्रकरणात तांत्रिक पुराव्यासह एआयचा वापर करुन गुन्हेगारांना शोधलं जाईल, कुणालाही सोडणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या जवळचे आरोपी असल्याचा दानवेंच्या आरोपांवर त्यांनी "आपण जेव्हा एखाद्यावर आरोप करतो, तेव्हा त्याची खातरजमा करायला हवी. सभागृहात आरोप होत असल्यानं 12 कोटी जनतेपर्यंत ते पोहोचत असतात, त्यामुळे एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो. या प्रकरणात आतापर्यंत एकाचाही आरोपीला वाचवण्यासाठी दबाव आलेला नाही." या शब्दांत राज्य सरकारची भूमिका मांडली.

हेही वाचा :

  1. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची 'ईव्हीएम हटाव'करिता घोषणाबाजी
  2. मंत्रिमंडळात अमरावतीची पाटी कोरीच, रवी राणांना पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी
  3. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? वाचा मंत्र्यांची यादी फक्त एका क्लिकवर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.