ETV Bharat / state

रील बनवणे जिवावर बेतले...; दोघांनी गमावला जीव तर तीन जण जखमी, पाहा व्हिडिओ - Nagpur Accident News - NAGPUR ACCIDENT NEWS

Nagpur Accident News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. नागपूर कोराडीजवळील पाझरा गावात एक कार उलटल्यानं भीषण अपघात झालाय. रील बनवताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय.

Nagpur Accident News
नागपूर अपघातात दोघांचा मृत्यू (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 4:50 PM IST

नागपूर Nagpur Accident News : भरधाव कारमध्ये स्टंटबाजी करणं आणि मोबाईलवर रील बनवणं दोन तरुणांच्या जिवावर बेतलं आहे. भरधाव कार दुभाजकावर जाऊन आदळल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नागपूर कोराडी मार्गावरील पांजारा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलाय.

नागपूरात भीषण अपघात (ETV BHARAT Reporter)

अपघातात दोघांचा मृत्यू : विक्रम गादे आणि आदित्य पुण्यपवार अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान विक्रम गादे, आदित्य पुण्यपवार, जय घनश्याम भोंगाडे, सुजल प्रमोद चव्हाण आणि सुजय राजन मानवटकर हे पाच तरुण कारने कोराडीच्या दिशेने निघाले असताना हा अपघात झाला.

स्टंटबाजी करताना कार दुभाजकावर आदळली : कोराडी नागपूर मार्गावरील पांजरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही तरुण कारने स्टंटबाजी करत होते. तर काही मोबाईलवर स्टंटबाजी रिल्स स्वरूपात रेकॉड करत होते. त्याचवेळी अतिशय सुसाट वेगाने पळत असलेल्या कारवरील तरुणांचे नियंत्रण सुटले आणि भरधाव अनियंत्रित कार थेट ६ बॅरिकेड्स तोडून दुभाजकावर जोरात आदळली. ज्यामध्ये दोन तरुणांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल : ज्यावेळी कारला अपघात झाला त्यावेळी ती कार कोण चालवतं होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी, कारमधील पाचही तरुण हे मौजमजा करताना बेजबाबदारपणे कार चालवत असल्याचं इन्स्टाग्रामवरील व्हिडिओनंतर स्पष्ट झालय.

हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत : गेल्या काही दिवसांमध्ये स्टंटबाजी आणि रील बनवण्याच्या नादात अनेक अपघात घडत आहेत. मागील काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप तरूणाई या गोष्टीला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा -

  1. भरधाव टिप्परनं अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडलं, हिंगणाच्या वानाडोंगरी येथील घटना
  2. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात सहा जण ठार, एक गंभीर
  3. Nagpur Police Survey : नागपूरच्या ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 दरम्यान सर्वाधिक अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.