ETV Bharat / state

माझी अटक बेकायदेशीर, मला मुक्त करा; सचिन वाजेची न्यायालयात याचिका - Sachin waze Arrest

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Sachin waze Arrest : आपली अटक बेकायदेशीर असल्याने तत्काळ आपली मुक्तता करावी, अशी मागणी करणारी याचिका सचिन वाजेने दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या अंतरिम जामिनाच्या अर्जावरदेखील यावेळी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Sachin waze Arrest
सचिन वाजेची न्यायालयात याचिका (Etv Bharat File Photo)

मुंबई Sachin waze Arrest : - 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात 2021 पासून अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी सुटकेसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याने तत्काळ आपली मुक्तता करावी, अशी मागणी करणारी याचिका सचिन वाजेने दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी निश्चित करण्यासाठी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर आले होते. त्यामध्ये वाजेतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर स्पष्टतेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या अॅटर्नी जनरलना नोटीस बजावलीय. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या अंतरिम जामिनाच्या अर्जावरदेखील यावेळी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार : खरं तर सीआरपीसीच्या कलम 306 (4) (b) च्या संवैधानिक वैधतेला सचिन वाजे याने या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याबाबत देशाचे अॅटर्नी जनरल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सचिन वाजे याच्यातर्फे अॅड. रौनक नाईक, दक्षता दुपारे यांनी बाजू मांडली. तत्पूर्वी दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. मात्र त्यांनी या प्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. सचिन वाजेविरोधात दहशतवादी कृत्यांमुळे यूएपीएअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानी जिलेटिनने भरलेले वाहन सापडले होते, त्यानंतर झालेल्या चौकशीत वाजेची त्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले होते.

वाजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट : सचिन वाजे एकेकाळी मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जात होता. 2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी सचिन वझेला निलंबित करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

हेही वाचाः

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचीही होणार बदली

सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.