ETV Bharat / state

राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शरद पवार, सुप्रिया सुळेंचं भरपावसात आंदोलन, उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन - MVA Protest In Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 10:17 AM IST

Updated : Aug 24, 2024, 2:11 PM IST

MVA Protest In Maharashtra : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषित केलेला महाराष्ट्र बंद मुंबई उच्च न्यायालयामुळे स्थगित करावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज महाराष्ट्रभर आंदोलन पुकारलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला भाजपाच्या महिला आघाडीनंही आंदोलन करत प्रत्युत्तर दिलं.

MVA Protest In Maharashtra
महाविकास आघाडीचं आंदोलन (ETV Bharat)

मुंबई/पुणे MVA Protest In Maharashtra : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रभर सरकारविरोधात निषेध आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात भरपावसात आंदोलन केलं. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनसमोर आंदोलन केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही मुंबईत आंदोलन करत सरकारवर टीका केली.

.

पुण्यात भरपावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं आंदोलन (Reporter)

पुण्यात भरपावसात मूक आंदोलन : बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा तसंच राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. पुण्यात शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक तासाचं मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र, पावसात भिजत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे मूक आंदोलन करत होते. पावसामुळं सुप्रिया सुळेंनी डोक्यावर पदर घेत आंदोलन केलं.

उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन : महाविकास आघाडीकडून शनिवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. दरम्यान, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वेगवेगळ्या ठिकाणी मूक आंदोलनात सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांनीही दादर येथील शिवसेना भवन परिसरात आंदोलन केलं. यावेळी शिवसेना - UBT पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. "राज्य सरकारविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड चिड आहे. तसंच कालच्या न्यायालयाच्या निर्णयामुळंही नागरिकांमध्ये रोष आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना - UBT पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : "हे सरकार निढवलेलं आहे. आरोपीला कठोर शिक्षा देणं गरजेचे होतं, परंतु हे सरकार आरोपीच्या शिक्षेवर पांघरून घालण्याचं काम करतंय. त्यामुळं आम्हाला महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. आज कडकडीत बंद होणार होता. मात्र, या बंदचा सामना करण्याची ताकद सरकारकडं नाही. त्यामुळं त्यांनी आपले चेले-चपाटे कोर्टात पाठवले. कोर्टानं बंदमध्ये अडथळा आणण्याचं काम केलं. आमदार अपात्र प्रकरण दोन वर्ष कोर्टात प्रलंबित असताना काल कोर्टानं ज्या तात्परतेनं यावर निर्णय घेतला त्याबद्दल मी कोर्टाचे धन्यवाद देतो," अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

काँग्रेसचं मुंबईत आंदोलन : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाणे येथे मूक आंदोलन केलं. मूक आंदोलन आणि काळ्या फिती बांधत या सर्वांनी राज्य सरकारचा निषेध केला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. "आम्हाला लाडली बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण पाहिजे. महाराष्ट्रात अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. आपण त्याविरोधात आवाज उठवतो, सरकार विविध मार्गांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते, पण आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार," अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.

न्यायालयानं जनभावनेचा विचार करायला हवा होता - नाना पटोले : "अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहे हे सरकारचं अपयश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबई उच्यन्यायालयानं बंद संदर्भात दिलेल्या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालय जाऊ. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार आहे निर्णय द्यायचा. मात्र, जनतेच्या भावनांचा विचार देखील त्यांनी करायला हवा होता," अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सरकारविरोधात बॅनर : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ दादर येथील शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करत सरकारवर निशाणा साधला. शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. असंवेदनशील सरकारनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा आशय असलेलं बॅनर चर्चेचा विषय ठरला. सदर बॅनरवर ऑगस्ट महिन्यात अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांची तारखेनुसार माहिती दिली.

हेही वाचा -

  1. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest
  2. मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती, दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ - Sexual harassment of minor girls
  3. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल - Bombay high court News

Last Updated : Aug 24, 2024, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.