ETV Bharat / state

ऊर्जा मार्ग उद्घाटनासाठी सज्ज; मुंबईला मिळणार अतिरिक्त 2,000 मेगावॉट वीज - Mumbai Urja Marg Project

Mumbai Urja Marg Project : मुंबईकरांना यंदा वीज कपातीची काळजी राहणार नाही. या महिन्याच्या अखेरीस पडघा-खारघर वीजवाहिनी कार्यान्वित होणार असल्यानं मुंबईला अतिरिक्त 2,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार, असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख निनाद पितळे यांनी दिली.

Mumbai Urja Marg Project
मुंबई ऊर्जा मार्ग (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 6:59 PM IST

मुंबई Mumbai Urja Marg Project : मुंबईकरांचा विजेचा प्रश्न यंदा सुटणार आहे. पडघा-खारघर वीज वाहिनीमुळे मुंबईकरांना यावर्षी अतिरिक्त 2,000 मेगा वॅट वीज मिळणार आहे. या वीज लाईनची एकूण लांबी 90 किमी आहे, परंतु यातील 30 किमी जंगलाच्या जमिनीतून आणि 20 किमी डोंगराळ प्रदेशातून जातो. या नवीन वीज लाइनमुळे मुंबईला अतिरिक्त 2,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांना 400 कोटीची नुकसान भरपाई : या वीजवाहिनीसाठी पनवेल, नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी यासह अन्य भागांत ट्रान्समिशन लाइनच्या मार्गातील सुमारे 20 हजार झाडं तोडण्यात आली. टॉवर आणि उर्जा लाईनसाठी जमिनी देणाऱ्या 10,728 शेतकऱ्यांना 400 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आली. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. जानेवारी 2023 मध्येच कामाला सुरुवात झाली आणि 16 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पाची सुरुवातीची किंमत 900 कोटी रुपये होती, जी नंतर वाढून 1,140 कोटी रुपये झाली.

उन्हाळ्यात वाढते विजेची मागणी : "उन्हाळ्यात एमएमआरमध्ये सर्वाधिक विजेची मागणी 4,500 मेगावॅट होती. राज्य सरकारने 323 चौरस किलोमीटरच्या नवीन शहर विकास प्राधिकरणाला यापूर्वीच मान्यता दिली असल्यानं या विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पनवेल तालुक्यातील 16 गावांमधून मुंबई आणि उपनगरांना वीजपुरवठा करणाऱ्या मुंबई पॉवर प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या बहुचर्चित प्रकल्पातून लवकरच विजेचे वहन सुरू होणार आहे. यामुळे मुंबईला 2,000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार," असं प्रकल्प प्रमुख निनाद पितळे यांनी सांगितलं.

मुंबई महानगर क्षेत्र झपाट्यानं विकसित होत आहे. निवासी भागांपासून, औद्योगिक वसाहतींपासून ते वाहनांच्या इंधनापर्यंत, अतिरिक्त विजेची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं हा ऊर्जा मार्ग प्रकल्प उभारला. दोन वर्षांपासून मुंबई पॉवर प्रोजेक्टद्वारे हाय पॉवर लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पनवेल तालुक्यातील 16 गावांच्या जमिनी लागणार आहेत. ओवे, किरवली, आडिवली, धानसर, तुर्भे, नेवली, टेंबोडे, वळवली, कोलवाडी, पालीबुद्रक, हेदुटणे, चिंद्रण, चिंचवली, मोहदर, कांडप या गावांमधून ही वीजवाहिनी उभारण्यात आली आहे.

"2022 मध्ये या प्रकल्पातील भूसंपादनाचं धोरण ठरवून भूधारकांना भरपाई निश्चित करण्यात आली. नव्यानं टाकलेल्या हाय पॉवर लाईनद्वारे गुजरातमधून मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या हाय पॉवर लाईन्समधून लवकरच वीजपुरवठा सुरू होणार" असं निनाद पितळे यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Vasantrao Chavan Funeral
  2. चला जर्मन भाषा शिकूया! वाढोणा गावातील चिमुकल्यांमध्ये उत्साह, शिक्षिका होणार प्रशिक्षित - ZP School Student Will Learn German
  3. खळबळजनक ! भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी चिमुरडीचा मृत्यू - Dog Bite Death In Bhiwandi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.