ETV Bharat / state

मुंबईकर पुन्हा हादरले : शाळेत जाणाऱ्या बालिकेवर रिक्षा चालकाचा अत्याचार, चेंबूरमधील खळबळजनक घटना - Minor Girl Abused In Mumbai - MINOR GIRL ABUSED IN MUMBAI

Minor Girl Abused In Mumbai : शाळेत जाणाऱ्या 13 वर्षीय चिमुकलीवर रिक्षा चालकानं लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. रिक्षा चालकानं फूस लावून या पीडितेला पडक्या इमारतीत नेऊन लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात नराधम रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Minor Girl Abused In Mumbai
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 1:30 PM IST

मुंबई Minor Girl Abused In Mumbai : मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चेंबूर परिसरात देखील अशाच प्रकारे खळबळजनक घटना घडली आहे. 13 वर्षीय चिमुरडीवर रिक्षा चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाळेत जाताना पडक्या इमारतीत नेऊन लैंगिक अत्याचार : चेंबूर परिसरातील शाळेत जात असताना रिक्षा चालकानं बालिकेला फूस लावून नेलं. त्यानंतर चिमुरडीला पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आईला काही न सांगण्याची धमकी दिली. तसेच नराधम रिक्षा चालकानं घरी काही सांगितल्यास आईला मारुन टाकण्याची धमकी देखील दिली, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात विनयभंग तसेच बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी रिक्षा चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात; तरुणीचे नग्न फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी - Beed Rape Case
  2. तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide
  3. अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.