ETV Bharat / state

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी, अमोल कीर्तिकरांचा निसटता पराभव - Lok Sabha Election Results

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 8:34 PM IST

Updated : Jun 4, 2024, 10:31 PM IST

Mumbai North West Lok Sabha Election Results : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. रवींद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळं अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झालाय.

Amol Kirtikar
अमोल कीर्तिकर (ETV BHARAT MH DEsk)

मुंबई Mumbai North West Lok Sabha Election Results : महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. आमोल कीर्तिकरांना विजयी घोषित केल्यानंतर रवींद्र वायकर यांनी मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी केली होती. त्यातं त्याचा केवळ 48 मतांनी विजय झालाय. रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली असून आमोल कीर्तिकरांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळालीय.

काय होत मतदारसंघाचं गणित : मुंबई उत्तर-पश्चिम म्हणजेच मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ तसा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरतोय. कारण उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच म्हणजे 9 मार्चलाच शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतलीय. यानंतर तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे आणि आता शिंदेंच्या सेनेत असणारे माजी खासदार संजय निरुपम यांनी आपण खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार करणार नसल्याचं म्हणत ही जागा काँग्रेसच्या हक्काची असल्याचं म्हटलं होतं. ती जागा ठाकरेंना द्यायला नको होती, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी कॉंग्रेसवरच टिका केली होती. यामुळं त्यांना कॉंग्रेसनं सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वीच संजय निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्याशिवाय या मतदारसंघात विविध धर्माचे मतदार आहेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुर्णतः बदलली आहेत. यामुळं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्येच लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांचा विजय झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव झालाय. यात मजेशीर बाब म्हणजे या मतदारसंघाचे विद्यामान खासदार गजानन किर्तीकर हे शिदेंच्या शिवसेनेत असून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळं या मतदारसंघात एकप्रकारे बाप विरुद्ध मुलगा अशीही लढत पाहायला मिळणार अशी चर्चा होती.

मतदारसंघाचं वैशिष्ट्य : या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे या जागेवर सिनेतारकांचं जास्त वर्चस्व राहिलंय. कारण या मतदारसंघात गोरेगावमध्ये 520 एकरमध्ये पसरलेली फिल्म सिटी येते. तसंच मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं 1 हजार 800 एकरांचं जंगलही याच लोकसभा मतदारसंघात येतं. येथील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खूप आकर्षित करतात, यात वर्सोवाचा समुद्रकिनारा देखील समाविष्ट आहे. मात्र आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई वायव्य मतदारसंघात मतदारांनी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस आघाडी अशा दोन्ही बाजूंनी संमिश्र कौल दिल्याचं इतिहासात दिसून येतं. या मतदारसंघात मोठ्या सीमाबदलानंतर 1967 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शांतीलाल शहा निवडून आले होते. नंतर 1971 च्या निवडणुकीतही काँग्रेसचेच हरी रामचंद्र गोखले विजयी झाले होते. मात्र आणीबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत देशभरात जनता पक्षाची लाट आली होती. याच लाटेचा फायदा घेत त्यावेळेस जनता पक्षाकडून प्रसिद्ध कायदेतज्ञ राम जेठमलानी यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पुढं 1980 साली इंदिरा गांधी यांनी देशभरात जोरदार पुनरागमन केलं असलं, तरी या मतदारसंघात मात्र मतदारांनी जेठमलानी यांच्याच पारड्यात आपलं दान टाकलं होतं. नंतर 1984 साली झालेल्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसची मोठी लाट होती. याच वेळी काँग्रेसनं या मतदारसंघात अभिनेते सुनील दत्त यांना तिकीट दिलं, तेव्हा कॉंग्रेसच्या लाटेत 1984 साली सुनील दत्त या मतदारसंघातून लोकसभेत गेले. यानंतर 1989 आणि 1991 च्या लोकसभेतही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत खासदारकीची हॅट्रीक केली. परंतु, 1996 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील दत्त यांच्या या गडाला शिवसेनेच्या मधुकर सरपोतदारांनी सुरंग लावला. ते या मतदारसंघातून विजयी झाले. पुढं दोन वर्षांनी झालेल्या 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीतही सरपोतदार यांनांच लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. मात्र त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळं पुढच्याच वर्षी म्हणजे 1999 मध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. या निवडणुकीत सेनेच्या सरपोतदार यांना पराभूत करण्यात सुनील दत्त यशस्वी झाले. ते या मतदारसंघातून चौथ्यांदा खासदार झाले. नंतर 2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार सत्तेत आलं, तेव्हाही ते खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले. मात्र पुढच्याच वर्षी त्यांचं निधन झालं. या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसनं सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना तिकीट दिलं आणि त्या विजयीही झाल्या. पुढं 2009 साली काँग्रेसच्या बाजूनं मतदारसंघातील मतदारांचा कल असताना देखील दत्त यांनी आपला मतदारसंघ बदलला. तेव्हा या मतदारसंघात कॉंग्रेसच्या गुरुदास कामत यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांचा पराभव केला होता. तर प्रिया दत्त यांनी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि त्या विजयीही झाल्या.

मोदी लाटेत किर्तीकरांचा विजय : यानंतर 2014 मध्ये देशभरात मोदी लाट होती. याच मोदी लाटेत या मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी एकतर्फी विजय मिळवत कॉंग्रेसच्या गुरुदास कामत यांचा 1 लाख 83,028 मतांनी पराभव करत 2009 च्या पराभवाचा बदला घेतला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना 4 लाख 64 हजार 820 मतं मिळाली होती. त्यांच्याविरोधात उभे राहीलेल्या काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी 2 लाख 81 हजार 792 मतं घेतली होती. मागच्या म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेनं या जागेवर पुन्हा एकदा गजानन कीर्तिकर यांना तिकीट दिलंय. त्यानंतर ते 2 लाख 60 हजार 328 मतांनी विजयी झाले. त्यांना या निवडणुकीत 5 लाख 70 हजार 63 मतं मिळाली. तर या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांना 3 लाख 9 हजार 335 मतं मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश शेट्टी यांना 23 हजार 367 मतं मिळाली होती.

प्रचारासाठी दोन महिन्यांचा कालावधी : मात्र, या निवडणुकीत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्येच लढत झाली. कारण या मतदारसंघातून ठाकरे गटानं शिंदेंच्या सेनेत असलेले गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली होती. अमोल कीर्तिकर हे युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत. परंतु ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली असली, तरी निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यांनी 2014 साली कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यातच उद्धव ठाकरेंनी मार्च महिन्यातच त्यांची उमेदवारी घोषित केल्यानं त्यांना प्रचारासाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. यादरम्यान त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांच्या दोनदा मतदारसंघात प्रचार फेऱ्या झाल्या. त्यातच त्यांचे वडील खासदार असल्यानं गेल्या 10 वर्षात मतदारसंघाशी थेट संपर्क असल्यानं तसा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी काही नवीन नाही. तर त्यांच्या विरोधात असलेले रविंद्र वायकर हे शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे होते. मात्र, ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर त्यांनी शिंदेंच्या सेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ते देखील लोकसभेची प्रथमच निवडणूक लढवत आहेत. मात्र गेल्या 35 वर्षेंपासून ते राजकारणात असून चार वेळा महापालिकेत नगरसेवक, तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्यानं त्यांना निवडणुकींचा प्रदीर्घ अनुभव आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारात कमी मिळाला असला, तरी त्यांनी सकाळ-संध्याकाळ बैठका घेत जोमानं प्रचार केला. तसंच त्यांच्यासाठी भाजपाचे तीन आमदार, माजी खासदार संजय निरुपम, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे हेही प्रचारात उतरले होते, त्यामुळं त्यांचं काहीस पारडं जड वाटत होतं.

मनसेचा वायकरांना पाठिंबा : या वायव्य मुंबई मतदारसंघासाठी भाजपा मोठ्या प्रमाणात आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. पण जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाकडं गेला. त्यातच या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तर, त्यांच्या मुलानं ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र वायव्य मुंबईत उमेदवार जरी शिंदेंचा असला तरी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व भिस्त भाजपावर असणार असल्याचं चित्र होतं. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर या मतदारसंघातील नेते, लोकप्रतिनिधी यांनी त्यांना साथ दिली. पण, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरेंसोबत राहिले. या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. यात मराठी मतदारांप्रमाणेच उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच काही विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य समुदाय आहे. त्यामुळं भाषिक-धार्मिक कल लक्षात घेता, हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यातच मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते. त्यामुळं हेच मतदान निर्णायक ठरलंय. यातील मराठी मतं ही प्रामुख्यानं शिवसेना, मनसेकडं वळत असल्याचं म्हटलं जातं. त्यातच या निवडणुकीत महाविकास आघाडीमुळं काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे-समाजवादी मतं एकत्र आली. तर, दुसरीकडं महायुतीत शिवसेना शिंदे, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आता सोबतीला राज ठाकरेंची मनसेचा वायकरांना पाठिंबा होता. त्यामुळं ही लढत कोणालाही एकतर्फी होणार नाही, हे मात्र नक्की होतं.

ईडीकडून चौकशी : या मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यात थेट लढत झाली. मात्र या दोन्ही उमेदवारांच्या मागं ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. किर्तीकरांविरोधात मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु आहे. तर, रविंद्र वायकर यांच्या विरोधात कथित भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणारे रविंद्र वायकर हे ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले होते. राज्याच्या राजकीय परिस्थितीसह या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीही बदलून गेलीय. कारण कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत आता हयात नाहीत, तर प्रिया दत्त यांचं उत्तर मध्य मतदारसंघातून टिकीत कापण्यात आलंय. तसंच मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा कॉंग्रेस सोडून शिंदे गटात जाऊन राज्यसभेत गेले आहेत. संजय निरुपम यांनीही आपण खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार करणार नसल्याचं म्हणत ही जागा काँग्रेसच्या हक्काची असल्याचं म्हटलं होत. त्यामुळं ही जागा ठाकरेंना द्यायला नको होती, अशी आक्रमक भूमिका घेत कॉंग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरलीय. तसंच बाबा सिद्दिकी यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरलीय. त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्ष सोडला नसला, तरी त्यांनी कॉंग्रेस पक्षावर थेट टीका केली होती.

विधानसभेत कोणाचं वर्चस्व : या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये सेनेचेच सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके विजयी झाले होते. मात्र रमेश लटके यांचं परदेशात निधन झाल्यानंतर त्याजागी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋजुता लटके या विजयी झाल्या. सध्या रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा रिंगणात असले, तरी उर्वरीत दोन्ही आमदार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. तर बाकीच्या तीन विधानसभा म्हणजेच गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. गोरेगावमध्ये 2014 पासून भाजपाच्या विद्या ठाकूर, वर्सोव्यातून भाजपाच्या भारती लवेकर पासून विजयी होत आहेत. तर अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम विजयी झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघात कागदावर जरी महायुती मजबूत दिसत असली, तरी सामान्य कार्यकर्ता ठाकरेंच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळत होतं. यामुळं अमोल किर्तीकरांना कमी लेखून चालणार नव्हतं. या मतदारसंघात आता विजयाची 'मशाल' पेटणार की 'धनुष्य-बाण' खासदारकीचा वेध घेणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मतं घेणार यावरही या मतदारसंघातील निकाल अवलंबून होता.

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष- 2019: गजानन किर्तीकर (विजयी उमेदवार- शिवसेना) 56.61% मतं

वर्ष- 2014: गजानन किर्तीकर (विजयी उमेदवार- शिवसेना) 60.95% मतं

वर्ष- 2009: गुरुदास कामत (विजयी उमेदवार- काँग्रेस) 31.97% मतं

वर्ष- 2004: सुनील दत्त (विजयी उमेदवार- काँग्रेस) 53.03% मतं

वर्ष- 1999: सुनील दत्त (विजयी उमेदवार- काँग्रेस) 43.08% मतं

हे वाचलंत का :

  1. कोकणात नारायण राणेंचा डंका; विनायक राऊतांचा पराभव, नितेश राणेंकडून जल्लोष - Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024
  2. राज्यातील महाविकास आघाडीनं एनडीएचं वाढविलं टेन्शनं, वाचा विजयी उमेदवारांची यादी - maharashtra lok sabha 2024 winner list
  3. हवेत विरला एनडीएचा ४०० पारचा नारा, महाराष्ट्रासह उत्तप्रदेशमध्ये पिछाडी - Lok Sabha election results 2024

Last Updated : Jun 4, 2024, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.