मुंबई Central Railway Jumbo Mega Block : मध्य रेल्वे सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवरील अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू झाल्याची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कामाबाबत मध्य रेल्वेनं अपडेट शेअर केलेत.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आलाय. प्रवाशांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेता आणि एस्केलेटरची तरतूद आणि एफओबी पायऱ्यांचं रुंदीकरण यासारख्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी ही कामे महत्त्वपूर्ण आहेत. 1 जून रोजी, प्लॅटफॉर्म क्र. 5 वर आरसीसी बॉक्स प्लेसमेंट यशस्वीरित्या कार्यक्षम प्रगती दाखवून 04:05 तासांत पूर्ण झाले.
350 मजुरांचे 24 तास काम- 05:10 तासांत मिलिटरी बोगी वेल टाईप (एमबीडब्लूटी) रेकवर पोकलेन एक्साव्हेटर आणि रोलरसह यंत्रसामग्री आणि साहित्य त्वरीत जमा केले . न्यू मुलुंड गुड्स स्टेशनवर उपकरणे वेळेवर पाठवल्यानं अखंड कार्यप्रवाह आणि किमान व्यत्यय सुनिश्चित होतो. विशेष म्हणजे, 05:50 तासात साहित्य भरून बीआरएन (बीआरएन) रेक आल्यानं प्रकल्पाची गती आणखी वाढली. तसंच वेळेवर काम पूर्ण होण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकांसह 350 मजूर 24 तास काम करत आहेत.
प्रवाशांची सुरक्षेसाठी तपासणी- दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 च्या विस्ताराच्या संदर्भात नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची बारकाईनं तपासणी आणि प्रगत सिग्नलिंग सिस्टीमचं संक्रमण रेल्वेच्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेचे काम हे अत्यावश्यक आहे.
250 हून अधिक कर्मचाऱ्यांकडून कामे सुरू- 75 पैकी 65 पॉइंट्स, 120 पैकी 51 ट्रॅक आणि 60 पैकी 1 सिग्नलचं काम 1 जूनच्या दुपारपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 250 हून अधिक अत्यंत कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलंय. रेल्वेचा हा विशेष मेगाब्लॉक आज (2 जून) रात्रीपर्यंत असणार आहे.
हेही वाचा -
- मेगा ब्लॉकचा फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना, कोणत्या परीक्षा झाल्या रद्द, जाणून घ्या - Mumbai Mega Block Effect
- सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे 'मेगाहाल'; आज किती गाड्या रद्द? - Mumbai Mega Block
- मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block