मुंबई : अभिनेता वरुण धवनचा मास ॲक्शन एंटरटेनर 'बेबी जॉन' 2024मधील शेवटचा मोठा बॉलिवूड रिलीज चित्रपट आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला आहे. सध्या 'बेबी जॉन' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दुहेरी अंकांसह चांगली सुरुवात झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे 'बेबी जॉन'ला आणखी जास्त फायदा मिळाला आहे. 'बेबी जॉन' हा चित्रपट रिलीज झाल्यामुळे 'पुष्पा 2' आणि 'मुफासा'सारख्या चित्रपटांच्या कमाईत थोडा फरक पडला आहे.
'बेबी जॉन'ची कमाई : हॉलिडे रिलीज असल्यानं 'बेबी जॉन'ला जबरदस्त ओपनिंग मिळणे हे अपेक्षित होते. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,'थेरी'नं पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 18.1 कोटी रुपयांयाची कमाई केली होती. याशिवाय या चित्रपटानं जगभरात 39.96 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 'बेबी जॉन' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर12.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. बुधवारी चित्रपटाचा हिंदी व्याप 24. 53 टक्के होता. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' तिसऱ्या आठवड्यातही 'बेबी जॉन'ला रुपेरी पडद्यावर टक्कर देत आहे. 'पुष्पा 2'नं 25 डिसेंबर रोजी म्हणजेच बुधवारी 19.75 कोटीचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला. यामधून हिंदीत या चित्रपटानं 15 कोटींचं नेट कलेक्शन केलंय. आता हिंदी पट्ट्यातील 'पुष्पा 2'चं कलेक्शन हे 730.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'बेबी जॉन'बरोबर कुठला चित्रपट झाला रिलीज : 'पुष्पा 2' चित्रपट आता हिंदी पट्ट्या 800 कोटीची कमाई करेल असं सध्या चित्र दिसत आहे. दरम्यान किच्चा सुदीपचा ॲक्शन थ्रिलर 'मॅक्स देखील 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं कन्नडमधून 2024मधील सर्वात मोठी ओपनिंग घेतली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 10 कोटीची कमाई केली. दरम्यान 'बेबी जॉन' येणाऱ्या दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. या चित्रपटाकडून वरुण धवनला खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :