मुंबई Mumbai Local Train Megablock : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या दिव्या मार्गावरील रेल्वे या माटुंगा आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान जलद रेल्वे मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या काळात रेल्वे फक्त कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं जाणाऱ्या गाडीचा वेळ सकाळी 10:25 वाजेपर्यंत असणार आहे. तर, दुपारी 3:10 वाजेपर्यंत रेल्वे सेवा ठाणे ते माटुंगा सुरू असणार आहे. या गाड्यांचा मार्ग जलद मार्गावर वळवण्यात आला आहे. तसंच, या रेल्वे ठाणे मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव या रेल्वे स्थानकांवर थांबतील.
ट्रान्स हार्बर लाइन सेवा बंद : हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं गाड्या धावतील. दरम्यान, पनवेल दिशेनं सकाळी 11:5 ते सायंकाळी 4:5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परंतु, यामध्ये बेलापूर ते उरण आणि नेरूळ ते उरण रेल्वेसेवा मात्र व्यवस्थित सुरू राहणार आहे. सकाळी 10:33 ते दुपारी तीन वाजून 49 वाजेपर्यंत 'सीएसएमटी'कडं जाणारी रेल्वे सेवा आणि सीएसएमटीकडून सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 वाजेपर्यंत पनवेल दिशेनं जाणारी रेल्वे सेवा बंद राहणार आहे. तर, पनवेलहून सकाळी 11:2 वाजेपासून दुपारी 3:53 वाजेपर्यंत ठाण्याकडं जाणारी रेल्वे सेवा आणि ठाण्यातून सकाळी 10:1 वाजेपासून दुपारी 3:20 वाजेपर्यंत पनवेलकडं जाणारी डाऊन ट्रान्स हार्बर लाइन सेवा बंद राहणार आहे.
काही गाड्या उशिरा धावणार : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरही रविवारी जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर हा मेगाब्लॉक सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल. तर, दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुज ते गोरेगाव या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चर्चगेटकडं जाणाऱ्या आणि विरारकडं जाणाऱ्या जलद रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळं काही रेल्वे गाड्या रद्द होतील. तर, ज्या रेल्वे हार्बर लाईनवरून अंधेरी ते गोरेगाव चालवल्या जातील, त्या थोड्या उशिरा धावतील, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा :
1 अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!
2 राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी
3 छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, नाशिकच्या कार्यालयात पाठवलं पत्र