ETV Bharat / state

बस अपघातात मृत पावलेल्या नुपूराचं ठरलं होतं लग्न, कुटुंबाचा आधार हरपला! - Lalbaug Bus Accident - LALBAUG BUS ACCIDENT

Lalbaug Bus Accident : मुंबईतील लालबाग परिसरात रविवारी रात्री एका दुर्दैवी बस अपघातात नुपूर मणियारचा मृत्यू झाला आहे. नुपूर तिची आई आणि लहान बहीण असं तिघांचं कुटुंब होतं आणि त्यात ती एकटीच कमावती होती.

Lalbaug Bus Accident
लालबाग बस अपघात (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 10:04 PM IST

मुंबई Lalbaug Bus Accident : मुंबईतील लालबाग परिसरात रविवारी रात्री एका दुर्दैवी बस अपघातात नुपुरा मणियार (वय - 28 वर्ष) वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. बसमधून प्रवास करत असलेल्या एका मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातल्यामुळं हा अपघात झाला. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळं हा अपघात झाला.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर : नुपुरा मोठी मुलगी असल्यानं तिची आई आणि लहान बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर होती. तिच्या वडिलांचं कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान निधन झालं. आता कुटुंबातील एकमेव कमावता सदस्यही गेला. तिच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नूपुराचं लग्न ठरलं होतं. लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच नुपूराचा अपघाती मृत्यू झाल्यानं तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला आहे. हा अपघात झाला तेव्हा नूपुरा तिच्या नवऱ्यासोबत खरेदीसाठी बाहेर पडली होती.

नूपुरा आणि तिचा मंगेतर प्रथमेश अंजनकर (वय - 29 वर्ष ) लालबाग येथील बाजारात ॲक्टिव्हा स्कूटरवरून खरेदीसाठी गेले होते. सरदार हॉटेलसमोरील सिग्नलवर ते उजवीकडे वळत असताना बेस्ट बसनं त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेत नूपुराच्या बरगड्याला आणि पोटाला जखमा झाल्या.

उपचारादरम्यान मृत्यू : नूपुराला बाहेरून जखमी झाली नव्हती. मात्र, तिच्या पोटात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. अंतर्गत रक्तस्त्राव आणि कमी रक्तदाबामुळं केईएम रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तर स्कूटर चालवणाऱ्या प्रथमेशला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रथमेशनं स्पोर्ट्स कोट्यातून बँकेत नोकरी मिळवली होती आणि लवकरच दोघांचं लग्न होणार होतं. दुर्दैवानं, या दुःखद अपघातात नूपुराच्या मृत्यूनं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

हेही वाचा

  1. दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident
  2. प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीचे केले तुकडे-तुकडे अन् दिले नदीत फेकून; भाऊ, पत्नी अटकेत - Brother Killing Sister Pune
  3. अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.