ETV Bharat / state

"मुंबईकरांनो, मला तुमची मदत हवीय"; उद्योगपती रतन टाटांनी मागितली श्वानासाठी मदत - Ratan Tata On Dog Blood Donor

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 9:45 PM IST

Ratan Tata On Dog Blood Donor: उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या एका पोस्टनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मुंबईतील त्यांच्या 'टाटा ॲनिमल हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 7 महिन्यांच्या श्वानाला रक्ताची आवश्यकता असल्यानं त्यांनी मुंबईकरांकडं मदत मागितली आहे.

Ratan Tata
रतन टाटांनी केली श्वानाच्या रक्ताची मागणी (ETV Bharat MH Desk)

मुंबई Ratan Tata On Dog Blood Donor : रतन टाटा (Ratan Tata) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये उद्योगपती रतन टाटा यांनी चक्क मुंबईकरांकडंच मदत मागितल्यानं या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. ही पोस्ट देखील तितकीच भावनिक असल्यानं आधीच देशवासीयांच्या मनात असलेल्या रतन टाटा यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढला आहे. या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी मुंबईतील त्यांच्या 'टाटा ॲनिमल हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका श्वानाला रक्ताची आवश्यकता असल्यानं मुंबईकरांकडं मदत मागितली आहे. इतक्या मोठ्या उद्योगपतीनं एका श्वानासाठी मदत मागितल्यानं सध्या रतन टाटा यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे.

श्वानाच्या रक्ताची केली मागणी : आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये टाटा यांनी म्हटलं की, जखमी 7 महिन्यांच्या श्वानासाठी रक्ताची आवश्यकता आहे. या श्र्वानाला मोठ्या प्रमाणात ताप आणि अशक्तपणा असल्यानं त्याला रक्त चढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी एका श्वानाच्या रक्ताची आवश्यकता असून, रक्तदान करणारा श्वान कशा पद्धतीचा असावा याची माहिती देखील रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. रतन टाटा यांच्या पोस्टनुसार, रक्तदाता श्वान हा वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा आणि त्याचं वय 1 ते 8 वर्षांच्या दरम्यान असावं. तसेच, त्याचं वजन 25 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असावं, त्याचं लसीकरण केलं असावं, या श्वानला रेबीज प्रतिबंधक लसीकरण केलेले आवश्यक असून, त्याला कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रासलेले नसावे. हे निकष पूर्ण करणारे श्र्वानच रक्तदान करू शकते.

जखमी श्र्वानांसाठी केलं मदतीचं आवाहन : टाटा यांच्या पोस्टवर कॉमेंट सेक्शनमध्ये नेटकर्‍यांनी रतन टाटा यांचं कौतुक केलंय. या आधीही रतन टाटा अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जखमी श्र्वानांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. टाटा यांच्या पोस्टला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, साडेतीन हजारांहून अधिक लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या श्र्वानाला रतन टाटा यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळं योग्य असा रक्तदाता श्वान उपलब्ध झाला असून मुंबईकरांचे रतन टाटा यांनी आभार मानले आहेत. सोशल मीडियावर एलन मस्क, आनंद महिंद्रा हे उद्योगपती मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतात, त्या तुलनेत रतन टाटा सोशल मीडियावर फार कमी पोस्ट करतात. पण, कुत्र्यांवरचं त्याचं प्रेम कोणापासूनही लपलं नाही, याआधीही त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून कुत्र्यांना मदत करण्यासाठी पोस्ट केली होती.

हेही वाचा -

  1. प्राणी प्रेमींसाठी खुशखबर; मुंबईत उद्योगपती रतन टाटांनी प्राण्यांसाठी बांधलं रुग्णालय
  2. रतन टाटा यांचा वाढदिवस विशेष; स्वातंत्र्यापूर्वीपासूनच टाटा कुटुंब कॉर्पोरेट जगतात
  3. Ratan Tata Udyog Ratna Award : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' प्रदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.