ETV Bharat / state

भारतातून चीनमध्ये मोर पिसांच्या तस्करीचा प्रयत्न नावा शेव्हा बंदरातून 2 कोटी किमतीची डीआरआयकडून पिसे जप्त - मोरांची पिसे जप्त

Peacock Feathers Seized: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई युनिटने (डीआरआय) आज (14 फेब्रुवारी) नाव्हा शेवा बंदरातून अंदाजे 2 कोटी किंमतीची मोराची पिसे जप्त केली आहेत. अंदाजे 28 लाख मोराची पिसे आणि 16 हजार मोराच्या शेपटीच्या काड्या जप्त करण्यात आल्याची माहिती डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदल यांनी दिली आहे.

Peacock Feathers Seized
मोराची पिसे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 10:59 PM IST

मुंबई Peacock Feathers Seized : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई झोनल युनिटने (DRI) न्हावा शेवा बंदरात 28 लाखांची मोराची पिसे जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्करीविरोधी कारवाईत डीआरआय मुंबई झोनल युनिटने न्हावा शेवा बंदरातून मोराच्या शेपटीच्या पिसांची तस्करी भारतातून चीनमध्ये छुप्या पद्धतीनं होत असल्याची माहिती दिली. "डोअर मॅट" म्हणून सांगून मोराच्या पिसांची तस्करी केली जात होती. डीआरआयला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, मालाची तपशीलवार तपासणी करण्यात आली आणि अंदाजे 28 लाख मोराच्या शेपटीकडील भाग म्हणजेच पिसे आणि 16 हजार मोराच्या पिसाच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मोराच्या पिसांची तस्करी या कायद्यानुसार गुन्हा: जप्त केलेल्या मोराच्या शेपटीकडील भाग म्हणजेच पंखांची अंदाजे किंमत 1 कोटी 2 लाख असून ही मोराच्या पिसांची निर्यात सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आली आहेत. कारण त्यांची निर्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सह अन्य कायद्याच्या निर्यात धोरणाच्या अनुसूची 2 नुसार प्रतिबंधित आहे. तरीदेखील मोराच्या पिसांची निर्यात करण्यात आली.

आरोपीला न्यायालयीन कोठडी: निर्यातदाराने बेकायदेशीर निर्यातीमध्ये आपला सहभाग कबूल केला आणि त्याला अटक करण्यात आली. ACMM न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास सुरू आहे. अशी जप्ती DRI ची तस्करी विरोधी आदेश आणि अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या सिंडिकेट विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी DRI ची बांधिलकी देखील दर्शवत असल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

ट्रॉलीमधून दुर्मिळ प्राण्यांची तस्करी : वन्यप्राण्यांच्या तस्करीचं असचं एक प्रकरण 23 ऑगस्ट, 2023 रोजी बंगळुरू येथे उघडकीस आलं होतं. बँकॉकवरुन बंगळुरुमध्ये वन्यप्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्याचं हे प्रकरण होतं. या प्रकरणी एअर कस्टम अधिकाऱ्यांनी दोन ट्रॉली बॅगमध्ये आणलेले अजगर, दुर्मीळ कासवं, कांगारू आदी 234 वन्यप्राणी जप्त केले होते. या तस्करी प्रकरणी एअर कस्टम विभागानं एका तस्कराला 21 ऑगस्टच्या रात्री अटक केल्याची माहिती दिली होती.

हेही वाचा:

  1. आंतरजातीय-आंतरधर्मीय जोडप्यांसाठी' राज्यातील पहिलं 'सेफ हाऊस' सातारा जिल्ह्यात, 'असा' घेता येणार लाभ
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर, शेतकरी आंदोलनावरुन सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मोदींना कशाला प्राधान्य द्यावं ते कळत नाही
  3. प्रफुल्ल पटेल गिरवणार नितीश कुमारांचा कित्ता; खासदार होण्यासाठी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभा निवडणुकीचा भरणार अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.